तरुण भारत

कोल्हापूर जिल्हय़ात तिघांचा बळी, 150 पॉझिटिव्ह

यादवनगर, इचलकरंजी,चंदगड तालुक्यातील मृतांचा समावेश, बळींची संख्या 37 वर

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने चंदगड, इचलकरंजीत आणि कोल्हापूर शहरातील वृद्धांचा बळी घेतला, या तीन बळींमुळे कोरोना बळींची संख्या 37 झाली आहे. इचलकरंजी येथील पाटील मळय़ातील 78 वर्षीय वृद्ध, कोल्हापुरातील यादवनगर येथील 85 वर्षीय वृद्ध आणि चंदगड येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळपर्यत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सव्वाशेवर पोहोचली. यामध्ये कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील रूग्णांची संख्या अधिक आहे. कम्युनिटी स्प्रेडची भीती व्यक्त होत आहे.

 सकाळी 10 पर्यत 32 पॉझिटिव्ह रूग्ण

जिल्हय़ात बुधवारी सकाळी आलेल्या 17 पॉझिटिव्ह रूग्णांत हातकणंगले तालुक्यातील 62 वर्षीय वृद्ध, 47 वर्षीय महिला, रेंदाळ येथील 44 वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील 19 वर्षीय तरूणी, 42 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय तरूण, 44 वर्षीय महिला, 76 वर्षीय वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील 42 वर्षीय पुरूष, पुणे येथील 13 वर्षीय मुलगी, कोल्हापुरातील 40 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील 10 वर्षांची मुलगी, 52 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष, 72 वर्षीय वृद्ध, 56 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

मध्यरात्री आलेल्या 14 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील राजारामपुरीतील 29 वर्षीय, 23 वर्षीय, 34 वर्षीय, 32 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, टिंबर मार्केट येथील 47 वर्षीय पुरूष, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील 48 वर्षीय पुरूष, पाचगाव गणेशनगर येथील 40 वर्षीय पुरूष, गांधीनगर येथील 42 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला, 70 वर्षीय वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील 20 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

दुपारी 2 वाजता 25 पॉझिटिव्ह रूग्ण, शहर, करवीरमधील अधिक

दुपारी दीड वाजता 25 पॉझिटिव्ह रूग्णांत करवीर तालुक्यातील 32 वर्षीय पुरूष, 3 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, 6 वर्षीय बालिका, 41 वर्षीय पुरूष, महापालिका क्षेत्रात 80 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय तरूण, करवीर तालुक्यातील 15 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष, महापालिका क्षेत्रात 22 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, महापालिका क्षेत्रात 53 वर्षीय पुरूष, पन्हाळा तालुक्यातील 12 वर्षांचा मुलगा, महापालिका क्षेत्रात 25 वर्षीय पुरूष, 51 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील 53 वर्षीय पुरूष, महापालिका क्षेत्रातील 36 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील 40 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 15 वर्षांचा मुलगा, 21 वर्षीय तरूणाचा समावेश आहे.

सकाळी दहा ते दुपारी 3 वाजेपर्यंत 49 पॉझिटिव्ह

 पहिल्या टप्प्यात 18 अन्  दुसऱया टप्प्यात 25 आणि सात अशी रुग्ण संख्या आहे. दुपारी 2 नंतर आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील 13, करवीर तालुक्यातील 12 रुग्ण आहेत. यामध्ये गांधीनगर येथील 6 वर्षांची बालिका, 41 वर्षाचा पुरुष, शहरातील टिंबर मार्केट येथील 80 वर्षांचा वृद्ध, 39 वर्षांची महिला, करवीर तालुक्यातील उचगाव येथील 15 वर्षाची मुलगी, 30 वर्षांची महिला, गांधीनगर येथील 30 वर्षांचा पुरुष, 52 वर्षांचा पुरुष, वळीवडे येथील 35 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 22 वर्षांची महिला, आंबेवाडी पाटील गल्ली येथील साठ वर्षे महिला, शिंदेवाडी येथील बारा वर्षे मुलगा, गांधीनगर येथील 53 वर्षे पुरुष, चिंचवड येथील 40 वर्षीय महिला, शहरातील जाधववाडी येथील 51 वर्षीय महिला , फुलेवाडी येथील 36 वर्षीय महिला, टिंबर मार्केट येथील 13 वर्षीय मुलगी, 15 वर्षीय मुलगा, 15 वर्षाचा तरुण, 32 वर्षांचा पुरुष, 30 वर्षांची महिला, 30 वर्षांचा पुरुष आणि 85 वर्षांचा वृद्ध यांचा समावेश आहे.

दुस्रया टप्प्यातील सात रुग्णांमध्ये चंदगड तालुक्यातील तांबीळवाडी येथील 38 वर्षीय महिला, इचलकरंजी गणेश नगर चौथी गल्ली येथील 57 वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील कणेरी येथील 68 वर्षीय पुरुष, शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील 32 वर्षे पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील मान येथील आठ वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 22 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर येथील 29 वर्षे पुरुष आणि इचलकरंजी पाटील मळा येथील वृद्धांचा समावेश आहे.  इचलकरंजी येथील  62 वर्षाच्या वृद्ध पॉझिटिव्ह आला आहे.

टिंबर मार्केट, वारे वसाहतीतील 14 जण पॉझिटिव्ह

शहरात आणखी पंधरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केट येथील 28 वर्षाची महिला, 16 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, 34 वर्षांची महिला, 43 आणि 43 वर्षांचा पुरूष, वारे वसाहत येथील 40 वर्षाची महिला, 40 वर्षांचा पुरूष, 20 वर्षांचा पुरूष, 25 वर्षाचा पुरूष, 47 वर्षाचा पुरूष, 50 वर्षाची महिला आणि कदमवाडी येथील 38 वर्षाचा पुरूषांचा समावेश आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता आलेल्या 12 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील नारायण विहार अपार्टमेंटमधील 40 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील गुजर मळय़ातील 65 वर्षीय वृद्धा, टाकवडे वेसमधील 41 वर्षीय पुरूष, कोल्हापूर शहरातील कावळा नाका येथील 54 वर्षीय पुरूष, राजारामपुरीतील 33 वर्षीय पुरूष, गांधीनगर येथील 35 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष, कसबा बावडा जय भवानी गल्ली येथील 61 वर्षीय वृद्ध, पवार मळा येथील 59 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. सायंकाळी 9 पर्यत पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 98 झाली आहे.

Related Stories

कोल्हापूर : बिद्रीकडून “गरज सरो वैद्य मरो” धोरण

Abhijeet Shinde

केंद्राने मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी

Patil_p

वाधवान कुटुंबाला ‘ते’ पत्र देणारे गृहखात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

Abhijeet Shinde

कुंभोज परिसरात आढळलेला ‘तो’ प्राणी बिबट्या नसून रानबोका

Abhijeet Shinde

बचतगटाची उत्पादने आता सातासमुद्रापार

Sumit Tambekar

शिवाजी पार्कवरील एण्ट्रीपूर्वीच मनपाची कारवाई ; नारायण राणेंचे बॅनर हटवले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!