तरुण भारत

सुरूवातीची तेजी बाजाराने अंतिमक्षणी गमावली

रिलायन्स समभाग विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स18 अंकांनी तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्सने 700 अंकांचा टप्पा पार केला होता. परंतु अंतिम क्षणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांच्या विक्रीने देशातील बाजाराने दिवसभरातील मिळवलेली तेजी गमावल्याचे अनुभवाला आले. सेन्सेक्स काहीशी तेजी नोंदवत बंद झाला. कोविड 19 वर लस येण्याच्या संकेतामुळे शेअर बाजारात उत्साह भरून राहिला होता. यामध्ये जागतिक बाजारामधील तेजीच्या परिणामाचाही सकारात्मक लाभ बाजाराला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरील परिणामामुळे सेन्सेक्सने 777 अंकांचा एक टप्पा गाठला होता. परंतु अंतिम क्षणी हा माहोल कायम ठेवणे बाजाराला शक्मय झाले नसून दिवसअखेर सेन्सेक्स 18.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,051.81 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,618.20 वर स्थिरावला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे समभाग सर्वाधिक म्हणजे चार टक्क्मयांनी घसरले आहेत. याअगोदरच कंपनीचे समभाग व्यवहारादरम्यान 1,978.50 रुपयाच्या उच्चांकावर राहिले होते. कारण बुधवारी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. यामध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 7.7 टक्के हिस्सेदारी गुगल खरेदी करणार असल्यासह अन्य महत्वाच्या गोष्टींची घोषणा केली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात रिलायन्सच्या समभागांची विक्री झाली. 

सेन्सेक्समधील अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, ओएनजीसी, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभागही घसरले आहेत. मात्र तिमाही अहवालाच्या घोषणेच्या अगोदरच इन्फोसिसचे समभाग सहा टक्क्मयांनी तेजीत राहिले. सोबत एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक आणि हिंदुस्थान युनिलिक्हर यांच्या समभागांनी समाधानकारक तेजी प्राप्त केली.  

Related Stories

आदित्य बिर्ला फॅशनला 58 कोटींचा नफा

Patil_p

नेस्लेच्या निव्वळ नफ्यात 14 टक्के वाढ

Patil_p

ट्रक्टर विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता

Patil_p

लॉकडाऊनमुळे ईपीएफमधून 75 टक्के रक्कम काढता येणार

tarunbharat

फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांची संख्या 35 टक्के वाढली

Patil_p

देशांतर्गत विमान वाहतुकीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!