तरुण भारत

काश्मीरमध्ये भाजप नेत्याचे अपहरण

श्रीनगर

 जम्मू-काश्मीरच्या बारामुला जिल्हय़ात भाजप नेते मिराजुद्दीन मल्ला यांचे बुधवारी सकाळी अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांसंबंधी माहिती मिळू शकलेली नसली तरीही दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. मित्राला भेटण्यासाठी जात असताना मल्ला यांचे सेंट्रो कारमधून आलेल्या काही जणांनी अपहरण केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

Advertisements

मागील आठवडय़ात बांदीपोरामध्ये भाजप नेते वसीम बारी, त्यांचे वडिल आणि भावाची दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणली होती. वसीम हे भाजप जिल्हा अध्यक्ष राहिले होते. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे सत्र दहशतवादी संघटनांनी आरंभिले आहे.

 1 नोव्हेंबर 2018 रोजी जम्मूच्या किश्तवाड जिल्हय़ात दहशतवाद्यांनी भाजप प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांचे बंधू अजित यांची हत्या केली होती. तर 5 मे 2019 रोजी भाजप कार्यकर्ते गुल मोहम्मद मीर यांची दक्षिण काश्मीरच्या नौगाममध्ये दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणली होती.

Related Stories

कोरोना तांडव आणि टूलकिट

Patil_p

रॉचा आयएसआयला संदेश अन् अभिनंदन यांची मुक्तता

Amit Kulkarni

भारत-चीन तणाव : 12 ऑक्टोबरला दोन्ही देशाची कोअर कमांडर स्तरावर बैठक

datta jadhav

जम्मू काश्मीर : 581 नवे कोरोना रुग्ण; 6 मृत्यू

Rohan_P

कोरोनामुळे यंदा IITs, IIITs कडून फी वाढ नाही

prashant_c

मुदतठेवींचा व्याजदर एसबीआयने घटविला

Patil_p
error: Content is protected !!