तरुण भारत

वेटलिफ्टर प्रदीप सिंग उत्तेजक चाचणीत दोषी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेला वेटलिफ्टर प्रदीप सिंग (105 किलो वजन गट) उत्तेजक चाचणीत दोषी ठरला असून त्याला राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीने (नाडा) एका वर्षासाठी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय बीएसएफचा पंकज पन्नू हा धावपटूही दोषी असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावरही तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

विश्व उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) निर्बंधित केलेले मानवी संप्रेरक वाढीचे (एचजीएच) द्रव्य प्रदीप सिंगच्या चाचणीत आढळून आले आहे. प्रदीप हा विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन व 2019 राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमधील सुवर्णविजेता वेटलिफ्टर असून त्याची स्पर्धेबाहेर चाचणी घेण्यात आली होती. गेल्या मार्चमध्ये राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी पतियाळातील एनआयएस राष्ट्रीय शिबिरावेळी नाडाने त्याची ही चाचणी घेतली होती. प्रदीपबद्दल सूचना मिळाल्यानंतर तो नाडाच्या रडारवर होता. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. रक्ताच्या चाचणीत दोषी आढळणारा तो पहिलाच क्रीडापटू आहे, असे नाडाचे डीजी नवीन अगरवाल यांनी सांगितले.

‘भारतीय ऍथलीट्समध्ये एचजीएच आढळून येण्याची ही पहिली वेळ नव्हे.  याआधी मुत्रल चाचणीत हे द्रव्य आढळून आले होते. पण रक्ताच्या चाचणीत पहिल्यांदाच ते आढळून आले आहे. काही खेळाडू एचजीएचचा वापर करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती,’ असे अगरवाल यांनी स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये घेतलेल्या नमुन्याचा अहवाल मार्चमध्ये आला होता. त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याच्या ब चाचणीचा अहवाल येईपर्यंत ते जाहीर न करण्याचे नाडाने ठरविले होते. सध्या लॉकडाऊनमुळे चाचणी घेणे व त्याचा अहवाल पाठविणे कठीण बनले असल्याने आम्ही रक्ताचे नमुने घेणे थांबवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्ण मिळविलेला मध्यम पल्ल्याचा धावपटू पंकज पन्नूवरही तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तो बीएसएफमध्ये कार्यरत असून पंचकुला येथे झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत घेतलेल्या चाचणीत त्याने निर्बंधित डर्बेपोटीन घेतल्याचे आढळून आले. त्याने त्या स्पर्धेत 5000 मी. शर्यतीचे सुवर्णपदक मिळविले होते, असेही अगरवाल यांनी सांगितले.

Related Stories

जोनाथनचा विजय दिवंगत भावाला समर्पित

Patil_p

बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व

Patil_p

विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

Patil_p

पहिले द्रोणाचार्य पुरस्कार जेते ओ. पी. भारद्वाज कालवश

Patil_p

वनडे, टी-20 मालिका सिडनी, कॅनबेरात होणार

Patil_p

टी-20 विश्वचषकात रबाडा चौथा हॅट्ट्रिकवीर

Patil_p
error: Content is protected !!