तरुण भारत

अंजुणे धरणाने गाठली 86 मीटर इतकी पातळी

लवकरच धरण पूर्णक्षमतेने भरण्याच्या मार्गावर :  पाणी सोडण्याची सूचना देऊन सतर्कतेचा इशारा

डिचोली / प्रतिनिधी

Advertisements

   उत्तर गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले केरी सत्तरी येथील अंजुणे धरणाच्या भागात मुसळधार पावसाचा जोर चालूच असल्याने धरणाच्या पातळीत झापाटय़ाने वाढ होत आहे. जुलै महिन्याच्या मध्यवर्तीच या धरणाने 86.56 मीटर इतकी पातळी गाठल्याने धरणाच्या समोरील नदीच्या किनारी असलेल्या गावांना कोणत्याही

क्षणी धरणातील अतिरिक्त पाणी सोडयात येणार असल्याची सुचना देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आगामी काही दिवसात धरणाचे दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग सुरु होणार  आहे.

    जलसंसाधान खात्याने कष्टी, वाळवंटी नदीतून पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या गावातील लोकांनी खबरदारी घ्यावी, नदीत उतरू  नये तसेच काठावर जाऊन नये. अश्या आशयाची नोटीस विविध ग्रामपंचायतींना बजावली आहे.

सद्या धरणाची पाण्याची पातळी हि 86.56 मीटर इतकी आहे . ती 89.60 मीटर म्हणजेच धरणाच्या पूर्ण क्षमतेच्या साडेतीन मीटर कमी असताना पाण्याचा विसर्ग सुरु केला जाणार आहे. त्यामुळे केरी, पर्यें, साखळी, कारापुर सर्वण आदी पंचायत विभागातील नदीकाठच्या लोकांनी पाण्यात उतरू नये, गुरांना पाण्यात नेऊ नये, नदीच्या पात्रात भांडी घासणे व इतर बाबतीत सर्व ती खबरदारी घ्यावी अश्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती धरण अधिकाऱयांनी दिली. तसेेे®ा साखळी बाजार परिसरात याविषयी खबरदारीची संबंधित अधिकाऱयांकडून जाहिर सुचना देण्यात आली आहे.   डिचोली तालुक्मयातील आमठाणे धरणही पाच दिवसांपूर्वीच पूर्ण 50 मीटर क्षमतेने भरलेले असून पाण्याचा विसर्ग नानोडा नदीतून सुरु झाला आहे. त्या भागातील नादिकिनारील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती जलसंसाधान खात्याचे अभियंता के पी नाईक यांनी दिली.

Related Stories

अजय लोलयेकर यांना तृणमूल काँग्रेसची ऑफर

Amit Kulkarni

पाच पालिकांसाठी पहिल्याच दिवशी भाऊगर्दी

Amit Kulkarni

कोरोना व्हायरसमुळे नव्या झुवारी पुलाचे काम रखडले

Omkar B

बेकायदेशीर हातगाडय़ांवर मडगाव पालिकेची कारवाई

Patil_p

संस्था चालविण्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची

Amit Kulkarni

आज गणेश पूजनाने चतुर्थी उत्सवास प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!