तरुण भारत

बार्शीचे जवान वाघ कारगिल मध्ये शहीद

बार्शी/प्रतिनिधी

भारतीय सैन्य सेवेत असलेल्या बार्शीपुत्र जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. कारगिल येथून कर्तव्य बजावून घराकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने त्यांना शहीद दर्जा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भास्कर सोमनाथ वाघ (वय 40) हे गेल्या 20 वर्षांपासून भारतीय सैन्यसेवेत होते. मूळचे पाथरीजवळील वाघाची वाडी ता. बार्शी गावचे सुपुत्र असलेले भास्कर सोमनाथ वाघ हे कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब सध्या पुण्यात राहत होते. तर, आई-वडील मूळ गावीच आहेत. सुट्टी घेऊन आल्यावर ते गावाकडेच येत. गावातील मित्र परिवार आणि गावकऱ्यांसोबत त्यांचा जिव्हाळा होता.

दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वाघाची वाडी येथेच आणले जाणार आहे. तत्पूर्वी ते पुण्यात आणण्यात येईल. तेथून गावाकडे आणण्यात येणार असल्याची माहितीही त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली असून बार्शी तालुक्यातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”; भाजप नेत्याचं विधान

Abhijeet Shinde

साताऱयाची पॉझिटीव्हीटी 35 टक्क्यांवर

Patil_p

शाहूपुरीतील पाणी गळतीने हजारो लिटर पाणी वाया

Patil_p

सोलापूर : बार्शी पालिकेच्या मुख्याधिकारी पदी अमिता पाटील

Abhijeet Shinde

जम्बो हॉस्पिटलची युद्धपातळीवर तयारी….

Patil_p

गोकुळचा लवकरच उर्वरीत महाराष्ट्रात विस्तार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!