तरुण भारत

नटराजासन

नटराज हे शंकराचं एक नाव आहे. ‘नट’ म्हणजे नृत्य आणि राज म्हणजे राजा. त्यामुळे ही अतिशय सुंदर आसनस्थिती शंकराला अर्पण केली आहे. 

  • नटराजासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर सरळ, ताठ उभं राहा.
  • आता डावा हात पुढे करून सरळ ताणावा. तो जमिनीला समांतर असला पाहिजे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून वर उचला.
  • हात डोक्यावरून मागे नेऊन वळवत उजव्या पायाचं पाऊल पकडा. हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटाचा वापर करून पाय पकडा. हे करतानाच कोपरे आणि खांदे वर उचलत डोक्याच्या पाठीमागे हात जातील, असं उचला. उजव्या पावलाची पकड अजिबात ढिली होऊ देऊ नका.
  • उचललेला पाय आणि उजवा हात यांचा पाठीमागे धनुष्यासारखा आकार दिसला पाहिजे. उजवी मांडी जमिनीला समांतर राहिली पाहिजे आणि उजव्या पायाचा गुडघ्याखालील भाग जमिनीला लंब राहिला पाहिजे. डावा हात सरळ पुढे आणा. बोटांची टोके समोरच्या दिशेला पाहिजेत.
  • डाव्या पायाची गुडघ्याची वाढ वर-वर खेचा आणि डाव्या पायावर स्थिर रोवून उभे राहा. डावा पाय जमिनीवर लंब रेषेत दिसला पाहिजे. 20-25 सेकंद आसन स्थिर करा.
  • आसन सोडताना उजव्या पायाची पकड ढिली करा. दोन्ही हात खाली आणा आणि परत जमिनीवर दोन्ही पायांवर स्थिर उभं राहा.
  • हीच कृती परत डाव्या पायानं करा.

आसनाचे फायदे

Advertisements
  • नटराजासन हे सर्व शरीराला सौष्ठव देते. या आसनामुळे पायाचे स्नायू बळकट आणि ताकदवान होतात. खांद्यांना व्यायाम होतो. छाती पूर्णपणे ताणली जाते. सर्व मणक्यांना व्यायाम होतो.
  • या आसानामुळे शरीरातील चरबी कमी होते. पाठीचं दुखणं कमी होतं. हे तोलसन आहे. शरीराचा तोल एका पायावर आल्यामुळे एक प्रकारची जागरूकता येते. शरीर आणि मन स्थिर होतं. ङ घोटय़ाचं दुखणं, तीव्र पाठदुखी, गुडघेदुखी, हृदयरोग असणार्यांनी हे आसन करू नये.

Related Stories

सोरायसिसच्या अंतरंगात….

Omkar B

रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झालीये

Amit Kulkarni

जलोदुरनाशक मुद्रा

Omkar B

मधुमेहिंनो, पाय जपा

Omkar B

फायदे चक्रासनाचे

tarunbharat

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!