तरुण भारत

शाहूवाडी तालुका कंटेन्मेंट झोन जाहीर

प्रतिनिधी / शाहुवाडी

शाहूवाडी तालुक्‍यातील सहा गावात कोरोना बधित रुग्ण सापडल्यामुळे कंटेनमेंन्ट झोन म्हणून उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी दहा गावे जाहीर केली आहेत. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या १९६ वर पोहचली आहे. 

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, माण, वडगाव ,आरुळ, खुटाळवाडी, सुपात्रे, या गावात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत . त्यामुळे प्रशासनाने मलकापूर, माण या दोन्ही गावांच्या तीन किलो मीटर च्या हददीतील उचत, परळे ,येलुर पैकी जाधववाडी ,पेरीड, कोपार्डे , शाहूवाडी ,चनवाड, शिरगाव ,करंजोशी ,ओकोली, येळाणे ही गावे कंटेनमेंट झोन म्हणून जहिर केली आहेत . कोरोना विषाणूचा समुह संसर्ग सुरु झाला असून नागरीकांनी गर्दी करू नये सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका वैधकीय अधिकारी डॉ. एच आर निरंकारी यांनी केले आहे. मलकापूर नगर परिषदेच्या वतीन ही शहरात विशेष खबरदारी घेतली असून विना मास्क घालून फिरणारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी नेते आणि राज्यपालांची भेट ‘या’ कारणामुळे टळली

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 8 रुग्ण

Rohan_P

क्रूझ ड्रग्ज प्रकरण हा भाजपचा कट: नवाब मलिक

Abhijeet Shinde

प्रशिक्षित ‘डॉग कॅचर’ची कमतरता

Abhijeet Shinde

विलासपुरमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Patil_p
error: Content is protected !!