तरुण भारत

पुन्हा पावसाच्या हजेरीने हवेत गारवा

प्रतिनिधी / बेळगाव :

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळा दमदार सरी त्यानंतर पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असले तरी अत्यंत योग्यवेळेतच पाऊस आल्याने बळीराजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. काही भागामध्ये दमदार सरी कोसळल्या तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. शहराच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱया पावसामुळे हवेमध्ये गारवा होता. सध्या कोरोनामुळे जनता शहराकडे कामानिमित्तच येत आहे. त्यातच गुरुवारी पाऊस असल्यामुळे शहराकडे न जाणेच पसंत केले आहे.

दहा ते बारा दिवसांपूर्वी दमदार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. शेतकऱयांना पावसाची नितांत गरज होती. यावषी मान्सूनचे आगमनही वेळेत झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांनी भात पेरणी तसेच आता रोप लागवड जोमाने करण्यावर भर दिला आहे. शिवारातील महत्त्वाची कामे शेतकऱयांनी पूर्ण केली आहेत. दमदार पावसाची शेतकऱयांना गरज होती. त्यानुसार सध्या तरी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजातून समाधान व्यक्त होत आहे.

मान्सूनचे योग्यवेळेत आगमन झाल्यानंतर पुन्हा दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले आहेत. शेतकऱयांनी जवळपास खरीप पेरणी पूर्ण केली आहे. यावषी पावसाने चांगली साथ दिली आहे. मागील वषी महापूर आल्यामुळे पाऊस म्हटले की शेतकऱयांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सध्या तरी पावसाने अत्यंत योग्यवेळेत हजेरी लाऊन शेतकऱयांना दिलासा दिला आहे.

Related Stories

पेरू पिकातून एकरी 9 लाखांचे उत्पन्न

Patil_p

भवानी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंचमुखी स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

सहआयुक्त आकाश चौगुले यांचे दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Amit Kulkarni

रेल्वेखाली अनोळखी वृध्देचा मृत्यू

Patil_p

नाटय़ परिषदेच्यावतीने बॅकस्टेज कलाकारांना मदत

Patil_p

छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

Patil_p
error: Content is protected !!