वृत्तसंस्था /मुंबई :
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने प्रथमच घेतली. यामध्ये अनेक घोषणा केल्या परंतु गुंतवणूकादरांना विश्वास मिळेल अशी घोषणा न केल्याने मागील चोवीस तासात कंपनीचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयानी घटून समभाग 8 टक्क्मयांनी कोसळले असल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली आहे.
रिलायन्सचे बाजारमूल्य यामुळे 11.50 लाख कोटीच्या घरात पोहोचले आहे. बुधवारी समभाग 1,978 रुपयावरुन घसरुन ते गुरुवारी 1,812 रुपयावर पोहोचले आहे. वर्ष 2019 मध्ये एजीएममध्ये मोठय़ा घोषणा केल्यानंतर 10 मिनिटात समभागात मोठी तेजी प्राप्त करणाऱया रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यावेळी मात्र गुंतवणूकादारांच्या अंतर्गत विश्वास निर्माण करण्यात कमी पडल्याचे अभ्यासकांनी नोंदवले आहे. आणि याचा परिणाम 20 तासातच पहावयास मिळाला आहे.
एजीएम सुरु होण्याअगोदर रिलायन्सचे समभाग 1,978 रुपयावर पोहोचले होते. यावेळी बाजारमूल्य 12.54 लाख कोटीच्यावर होते. परंतु एजीएम सुरु झाल्यानंतर मात्र यामध्ये बुधवारी 9 टक्मक्मयांची घसरण नोंदवल्याचे पहावयास मिळाले आहे.