तरुण भारत

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोना, आज बाधितांचा आकडा 188च्या पुढे

सातारा, प्रतिनिधी
कोरोनाचे आकडे वेगाने वाढत असल्याने जिल्हय़ात काही तासांनी लॉकडाऊन सुरू होत आहे. त्यातच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कोरोना बाधित सापडले असल्याने साऱ्या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
आज दिवसभरात 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर वाईच्या दोघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीच्या अहवालात 119 जण बाधित झाल्याने जिल्हय़ाच्या एकुण बाधितांच्या आकडय़ाने 2 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. निकट सहवासितांमध्ये वाढणारा प्रादुर्भाव चिंताजनक आहे. जिल्हय़ाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाधित झाल्याने ते उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल झाले आहेत. पाटणचा एक कर्मचारीही बाधित झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेस दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालाने 68 जण बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements

सातारा जिल्हा परिषदेचे कामकाज दोन दिवस बंद
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच त्यांनी उपचारासाठी कराड येथील चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रात्रीच दाखल झाले.जिल्हा परिषदेचा अर्थ विभागातील लिपिक पाटण शहरातून अपडाऊन करत होते. त्यांना बाधा झाल्याचे समजताच रात्रीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दोन दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सुमारे आठ हजार कर्मचारी काम करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जिल्हा परिषदेला दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष कृष्णामध्ये दाखल
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या घरात गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाची एण्ट्री झाली होती.त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाला सुरुवातीला लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी त्यावेळी तपासणी केली होती.तेव्हा निगेटिव्ह आले होते.दुसऱया मुलाच्या तपासणीवेळी स्वाब दिला होता तेव्हा ही निगेटिव्ह आले होते.पुन्हा त्यांना खोकला जाणवू लागल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्या विनंतीवरून स्वाब तपासणी केली.त्याचा रिपोर्ट रात्री आला.ते रात्रीच उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

वाईतल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू
एकटय़ा वाई शहराची कोरोना बाधितांचा आकडा शंभर समीप पोहचला आहे.शहरात दोन बाधितांचा मृत्यू झाला असून मृत एक बाधित हा पोलीस ठाण्याच्या समोरच रहात होता.दुसरा मृत बाधित ब्राम्हणशाही येथील आहे.रात्रीच्या अहवालात आणखी एक पोलीस जवान बाधित आढळून आला असून आतापर्यंत वाई पोलीस ठाण्यातले 16 जवान झाले आहेत.त्यांच्या कुटूंबातले सदस्य बाधित झाले आहेत.हळूहळू वाई शहरातला विळखा घट्ट होत आहे. रात्रीच्या आलेल्या अहवालात 16 जण पॉझिटिव्ह तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाईतील ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष आणि सोनगीरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष यांना सारी ची बाधा झाल्याने दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोना संशयित म्हणून घेण्यात आलेला नमुना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. मात्र उपचारादरम्यान यांचा मृत्यु झाला आहे.

आमदारांच्या गावात कोरोना
आमदार मकरंद पाटील यांच्या बोपेगावात दोन दिवसांपूर्वी एक महिला बाधित आढळून आली. ती महिला पसरणीला पाहुण्याकडे गेली होती. तेथून आल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला होता आता ती उपचार घेत आहे.

बुधवारी रात्रीच्या अहवालात 119 जण बाधित
बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिह्यातील निकट सहवासित 114, प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 3 असे एकुण 119 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.

जावली तालुक्यातील पुनवडी येथील 56, 48, 19, 59, 24, 5, 42, 55, 13, 11, 3, 7, 5 आणि 70 वर्षीय महिला, 38, 55, 24, 22, 31, 30, 63, 27, 10, 60, 38, 34, 19, 7, 21 आणि 17 वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील 54 वर्षीय महिला, एकसळ येथील 6 महिने आणि 3 वर्षीय महिला, 34 आणि 21 वर्षीय पुरुष, भाडळे येथील 50, 32 आणि 21 वर्षीय महिला.

सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 30 आणि 40 वर्षीय पुरुष, करंदी येथील 43 वर्षीय महिला, 61 आणि 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 4, 17 आणि 38 वर्षीय महिला, 25, 15 आणि 45 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 53 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला, सदर बाजार येथील 56 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील पाचवड येथील 25 आणि 4 वर्षीय महिला, वाई येथील 40, 46 आणि 32 आणि 24 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, ओझर्डे (धोम-पुनर्वसन) येथील 57 वर्षीय पुरुष, सिधांतवाडी येथील 40 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 60, 36, 15 आणि 41 वर्षीय पुरुष, 30 आणि 7 वर्षीय महिला.

कराड तालुक्यातील वराडे येथील 32, 17, 15 वर्षीय पुरुष, 23 आणि 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 35 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 64 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरुष डॉक्टर.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 37, 55, 9, 8, 6, 30, 30, 18, 44, 49, 23, 45, 27 आणि 12 वर्षीय पुरुष, 33, 9, 24, 26, 90, 8, 19, 35, 60, 60, 41 आणि 36 वर्षीय महिला.

खटाव तालुक्यातील चितळी येथील 30 वर्षीय पुरुष, विखले येथील 27 वर्षीय पुरुष, निढळ 40 वर्षीय महिला. विसापूर येथील 13 आणि 11 वर्षीय कुमारवयीन.

फलटण तालुक्यातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष, मुरुम येथील 21 वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यातील पाटण शहरातील 53 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 45 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय पुरुष, अंबवडे खुर्द येथील 50 वर्षीय महिला.

कोरोना केअर सेंटरमध्ये सेवा देणारा तलाठी बाधित
कराडला रूग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर आता पार्ले कोरोना केअर सेंटरला सेवा बजावणारा 40 वर्षीय तलाठी कोरोना बाधित झाल्याचे बुधवारी रात्री आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. संबंधित तलाठी मलकापूर येथे वास्तव्यास आहेत. गुरूवारअखेर कराड तालुक्यातील बाधितांची संख्या 457 इतकी झाली असून यातील 324 रूग्ण बरे झाले आहेत. तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 126 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कराड उत्तरमधील तीन गावांचा कार्यभार असलेल्या तलाठय़ांची पार्ले येथील कोरोना केअर सेंटरला नेमणूक करण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी अपघात होऊनही हा कोरोना योद्धा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून पार्लेच्या कारोना केअर सेंटरवर सेवा बजावत होता.

पाटण शहरात कोरोनाचा शिरकाव
पाटण शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाटण शहरामध्ये कोरोनाला थारा दिला नव्हता तर चव्हाण गल्लीतील एक कर्मचारी सातारा जिल्हा परिषदेमध्ये कामाला आहे. त्यांना तीन दिवसांपासून थंडी ताप येत होता. बुधवारी ते स्वत: दवाखान्यात गेले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पाटण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाटण ते सातारा या एसटीने ते प्रवास करत होते. चव्हाण गल्लीत मायक्रो कंटेनमेंट झोन केला आहे.

29 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे.

जावली तालुक्यातील मुनावळे येथील 65 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 46 वर्षीय महिला, माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, कोडोली 48 वर्षीय पुरुष, सातारा येथील 24 आणि 28 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, जिहे येथील 4 वर्षीय बालिका.
कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 30 वर्षीय महिला.

कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, लटकेवाडी येथील 42 वर्षीय महिला, मलकापूर येथील 34, 50 वर्षीय पुरुष, 30 आणि 45 वर्षीय महिला, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 49 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील पसरणी येथील 44, 30 आणि 52 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, केंजळ येथील 70, 48 वर्षीय महिला, 48, 23 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातीलङ म्रयाचीवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष.

खटाव तालुक्यातीलङ राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष अशा 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबरोबरच डिस्चार्ज झालेल्यांची एकुण संख्या 1 हजार 179 झाली आहे.

473 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा जिल्हा रुग्णालय, 32,
कृष्णा 45,
उपजिल्हा कराड 46,
फलटण 36,
कोरेगाव 16,
वाई 74,
शिरवळ 49,
रायगाव 100,
मायणी 11,
महाबळेश्वर 20,
पाटण 31,
खावली 13

एकुण 473 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

जिल्हय़ात गुरूवारी
एकुण बाधित 68
एकुण मुक्त 29
एकुण मृत्यू 02

जिल्हय़ात गुरूवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 19933
एकुण बाधित 2141
घरी सोडण्यात आलेले 1179
मृत्यू 72
उपचारार्थ रुग्ण 890

Related Stories

कोडोली पोलीस ठाण्याच्या वाहनात सातत्याने बिघाड, नव्या वहानाची गरज

Abhijeet Shinde

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह 6 जणांवर गुन्हा

Patil_p

नगरसेवक अमोल मोहिते यांच्याकडून प्लाझ्मा दान

Patil_p

कोल्हापूर शहरात भटकी जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

Abhijeet Shinde

सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरला

Patil_p
error: Content is protected !!