तरुण भारत

जि.प.कर्मचारी बदलीसाठी 305 अर्ज प्राप्त, शासन निर्देशानुसार 15 टक्के मर्यादेत होणार बदली

कोल्हापूर / प्रतिनिधी

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट क आणि ड मधील कर्मचाऱयांची 15 टक्के मर्यादेपर्यंत बदली करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये प्रशासकीय बदल्या 7.5 टक्के व विनंती बदल्या 7.5 टक्के होणार आहेत. त्यानुसार जि.प.मध्ये बदल्यांची लगबग सुरु असून 14 जुलैपर्यंत 305 अर्ज प्राप्त झाले आहेत. 16 जुलै रोजी बदलीसाठी संवर्गनिहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध केल्या आहेत. अंतरिम सेवाज्येष्ठता यादीवर 17 ते 20 जुलै या दरम्यान सूचना मागविल्या जाणार आहेत. तर 21 जुलै रोजी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Advertisements

जि.प.कडे प्राप्त झालेल्या अर्जामध्ये सामान्य प्रशासन विभाग 94, ग्रामपंचायत विभाग 82, प्राथमिक शिक्षण विभाग 06, आरोग्य विभाग 53, वित्त विभाग 08, महिला व बालकल्याण विभाग 14, बांधकाम विभाग 23, पशुसंवर्धन विभाग 10, कृषि विभाग 15 असे एकूण 305 अर्ज प्राप्त झाले आहे.

23 जुलै रोजी जि.प.चे समिती सभागृह आणि कागलकर हाऊसमध्ये 10.30 ते 1 या वेळेत सामान्य प्रशासन विभागाकडील, दुपारी 2 ते 4 या वेळेत ग्रा.प.विभागाकडील तर 4 ते 5.30 या वेळेत प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व संवर्गातील कर्मचाऱयांची बदली होणार आहे. 24 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 12  या वेळेत आरोग्य विभाग, 12 ते 1.30 दरम्यान अर्थ विभाग, 2.30 ते 3 या वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, दुपारी 3 ते 4 बांधकाम विभाग, 4 ते 5.30 वाजता पशुसंवर्धन व कृषि विभागाकडील समुपदेशाने बदल्या होणार आहेत. 30 ते 31 जुलै रोजी पंचायत समिती स्तरावरील बदलीपात्र संवर्गातील सर्व संवर्गाची बदली होणार आहे.

Related Stories

डिजिटल विश्वात पोस्ट कार्ड टिकून

Abhijeet Shinde

शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोधने सेनेने खाते खोलले

Patil_p

एक्साईजने जप्त केलेल्या एक लाखाच्या दारूवर चोरट्यांचा डल्ला

Abhijeet Shinde

लोकसहभागातून गावांचा विकास करा

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव येथे शिवसेनेच्या वतीने चीनी हल्ल्याचा निषेध

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले ७ नवीन रुग्ण.

Abhijeet Shinde
error: Content is protected !!