तरुण भारत

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी विनाअट परवानगी

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना विनाअट परवानगी दिली आहे. 

Advertisements

गुरुवारीच इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी कुलभूषण यांची भेट घेतली. त्यांना या भेटीत मुक्त सवांद साधता आला नाही. पाकिस्तानने तशी सोय केली नव्हती. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे तिसऱ्यांदा कुलभूषण यांच्या भेटीची परवानगी मागितली.

कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि विनाअट कुलभूषण यांच्याशी चर्चा करता यावी, अशी विनंती भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडे केली. तसेच भेटीवेळी सुरक्षा कर्मचारीही न ठेवण्याची मागणी भारताने केली होती. पाकिस्तानने ही अट मान्य करून, कुलभूषण यांना भेटण्यासाठी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.

हेरगिरी आणि दहशतवादाच्याआरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.

Related Stories

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान

prashant_c

‘दीदी-ओ-दीदी’ टिप्पणीमुळे महिला नाराज

Patil_p

दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात भित्तिपत्रके ; १५ जणांना अटक

Abhijeet Shinde

भाजप कार्यकर्त्यांसह सुमित्रा महाजन पोलिसांच्या ताब्यात

prashant_c

व्याजदर कपातीचा निर्णय त्वरित मागे

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीर : सर्व सरकारी कार्यालयांवर फडकणार राष्ट्रध्वज

datta jadhav
error: Content is protected !!