तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांपार

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 लाखांचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये 43 हजार 829 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 1299 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 20 लाख 14 हजार 738 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 76 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

20.14 लाख कोरोनाबाधितांपैकी 13 लाख 66 हजार 775 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 71 हजार 141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 36 लाख 95 हजार 581 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 41 हजार 125 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन कायम; काही नियमात शिथिलता

Rohan_P

‘जी-7’मध्ये मोदींचा ‘व्हर्च्युअल’ सहभाग

Amit Kulkarni

कोरोना संसर्गावरील उपचारात स्टॅटिन्स प्रभावी

Patil_p

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सोडवणार : खा. संजयकाका पाटील

Sumit Tambekar

दिल्लीत डिझेलच्या दरात 8 रुपये 36 पैशांची घट; केजरीवाल सरकारचा दिलासा

Rohan_P

महाराणी, युवराजांचे लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!