तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिल्ह्यात सात दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून सात दिवसांचे लॉकडाऊन केले जाणार आहे. फक्त औषध आणि दूध विक्री सुरू राहणार आहे. किराणा दुकानही बंद राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांचे लॉक डाउन करण्याबाबत मत विचारात घेतले होते. यामध्ये काही नेत्यांनी लॉकडाउनला विरोध केला, तर काहींनी आग्रही मागणी केली होती. अखेर पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी उशिरा लॉक डाउन जाहीर केले. कोल्हापुरात पुन्हा लॉक डाउन होणार याबत तरुण भारतने प्रथम अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व जि. प. सीईओ अमन मित्तल उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

गोडोलीत चौपाटी झालीचं पाहिजे

Patil_p

नागपूर – कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हाळोलीत हत्तीचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

कसबा सांगाव येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 22,084 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सातारा : भात लागणीला आलाय वेग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!