तरुण भारत

इंडिगोची दोन आसने बुकींगची विशेष योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हवाई वाहतुकीमध्ये कार्यरत असणारी कंपनी इंडिगोने शुक्रवारी अनोखी सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली आहे. यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे अतिरिक्त सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इंडिगो आता फक्त दोन आसने बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

अतिरिक्त आसनासाठी शुल्क मुळ बुकिंगच्या 25 टक्के असणार आहे. ही सोय 24 जुलै 2020 पासून सुरु होण्याचे संकेत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 6 ई डबल आसन योजना प्रवासी पोर्टल, इंडिगो कॉल सेंटर किंवा विमानतळावरील काउंटरवर उपलब्ध होणार नाही. तर सदरची योजनेचा लाभ केवळ इंडिगोच्या वेबसाईटवरच मिळणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. इंडिगोने 20 जून ते 28 जून या कालावधीत 25,000 प्रवाशांचे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये प्रवाशांनी सामाजिक अंतर कमी ठेवण्यासाठीची मोठी चिंता व्यक्त करत असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

Related Stories

प्राप्तिकर विभागाकडून 1.54 लाख कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर

Amit Kulkarni

स्टरलाइट पॉवरचा आयपीओसाठी प्रस्ताव

Amit Kulkarni

11 लाखाहून अधिक उद्योगांची एमएसएमई पोर्टलवर नेंदणी

Omkar B

हळद दुधानंतर आता अमूलचे हळदयुक्त आईस्क्रीम बाजारात

Omkar B

‘वर्क फ्रॉम होम’चा नोकरी शोध 377 टक्क्मयांनी वाढला

Patil_p

भारतीय कंपन्यांची अन्य देशातील गुंतवणूक 1.93 अब्ज डॉलर्सच्या घरात

Patil_p
error: Content is protected !!