तरुण भारत

त्या कर्मचायाच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील 11 जण कोरोन टाइन

कर्मचायांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही काळजी घेतली नसल्याचा होतोय आरोप

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

जिल्हा परिषदेत अर्थ विभागाचे लिपिक दोन दिवसांपूर्वी बाधित झाले आहेत.त्यांच्या क्लोज कॉन्टॅकटमध्ये जे 11 जण आले होते त्यातील सात जण वर्ये इथल्या कोरोना सेंटरमध्ये तर 4 जण होम कोरोन टाइन करण्यात आले आहेत.त्यांचे सोमवारी स्वाब घेण्यात येणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचायांची कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप होऊ लागला आहे.

सातारा जिल्हा परिषदेत अर्थ विभागातील लिपिक कोरोना बाधीत झाल्याने खळबळ उडाली होती.गुरुवारी अर्थ विभागातील सर्व कर्मचायांना बोलवून त्यांच्याकडून त्यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली.जे जवळच्या संपर्कात आले ते 11 जण कोरोनटाइन करण्यात आले.त्यापैकी 4 जण होम कोरोनटाइन झाले असून बाकीचे वर्ये येथे कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत.त्यांचे सोमवारी स्वाब घेण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा परिषदेत एकच दिवस स्वयंचलित सानिटायझर मशीन चालले पुन्हा ती बंद पडली.प्रत्येक विभागाच्या कर्मचायांना मास्क आणि सानिटायझर दिले गेले नाही, असा आरोप आता कर्मचायांमधुन होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेची इमारत सानिटायझर करण्यात आली.

Related Stories

हौश्या गवश्यांवर कारवाईचा बडगा

Patil_p

कैलास स्मशानभूमीत 2201 कोरोना बळींवर अंत्यसंस्कार

Patil_p

पुस्तके खरेदी करण्यासाठी साताकरांची तोबा गर्दी

Patil_p

महाविद्यायीन युवतीचा विनयभंग करत तिला दिली जिवे मारण्याची धमकी

Abhijeet Shinde

वाईत चोरटय़ांचा धुमाकूळ ; सहा दुकाने फोडली..

Patil_p

सातारा : वर्णे येथे भाजपच्यावतीने स्वच्छता अभियान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!