22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

तिरुपती मंदिरातील 140 जणांना कोरोना

तिरुपती :

आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला मंदिरातील तब्बल 140 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये मंदिरातील काही पुजाऱयांचा समावेश असल्याचे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था आणि उपाययोजना असूनही कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. धोका वाढत असल्याने मंदिरातील कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांकडून सध्या काही दिवस मंदिरातील दर्शन बंद करण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी मंदिर ट्रस्टकडून पुजाऱयांची एक बैठक आमंत्रित करून आरोग्यविषयक सूचना करण्यात आल्या. अनलॉक-1 अंतर्गत 8 जूनपासून तिरुपती बालाजी मंदिर उघडण्यात आले होते. 11 जूनपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू करण्यात आले होते. सध्या मंदिरात दररोज 8 ते 9 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत.

Related Stories

‘महासत्ता’धीशाचे उद्या भारतात आगमन

tarunbharat

एका संशयिताला अटक, तिघांवर नजर

Patil_p

उत्तर प्रदेश : शहाजहांपुरमध्ये भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

pradnya p

पंतप्रधानांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Amit Kulkarni

सातपुडा वनांना ‘जीवनदान’

Patil_p

गिरीश मुर्मू यांनी स्विकारला कैगचे महालेखाकर म्हणून कार्यभार

pradnya p
error: Content is protected !!