तरुण भारत

टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर

किरकोळ बदल, पुढील वर्षी 23 जुलै रोजी उद्घाटन, 8 ऑगस्टला समारोप

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

पुढील वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यावर्षीचेच वेळापत्रक अल्पसा बदल करून कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी होणारी ही स्पर्धा एका वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

गेल्या मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) व जपान सरकारने ही स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या स्पर्धेच्या वेळापत्रकाची पुनर्रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनाची तारीख 23 जुलै 2021 ही याआधीच जाहीर करण्यात आली होती. पण त्याच्या पूर्ण वेळापत्रकाला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. लॉसेनमध्ये आयओसीच्या बैठकीत टोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीने हे वेळापत्रक शुक्रवारी सादर पेले होते. आधीच्या नियोजनाप्रमाणे या वर्षीच्या 24 जुलै रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार होते. त्यामुळे पुढील वर्षी प्रत्येक क्रीडाप्रकार या वर्षी ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधी सुरू होणार आहे.

नव्या वेळापत्रकास आता मंजुरी मिळाली असल्याने पुढील वर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 21 जुलै रोजी फुकुशिमा येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता महिलांच्या सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारातील स्पर्धेला सुरुवात होईल. सत्रांच्या वेळेमध्येही किरकोळ बदल करण्यात आला आहे. क्रीडा प्रकारांचा विचार करता ही स्पर्धा आजवरची सर्वात मोठी स्पर्धा होणार असून विक्रमी 339 पदके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचा समारोप 8 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे.

स्पर्धा संयोजकांसमोर या स्पर्धेसाठी 42 केंद्रे निश्चित करण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कारण 2021 साठी यातील अनेक केंद्रे इतर क्रीडांसाठी आधीच आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र ऑलिम्पिक ऑपरेशन्सचे कार्यकारी संचालक सातोशी यामाशिता यांनी ही केंद्रे तोंडी निश्चित करण्यात आली असून लवकरच ती अधिकृतपणे आरक्षित करण्यात येणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. यातील मॅरेथॉन व चालण्याची शर्यत उत्तरेकडील सापोरो येथेच घेण्यात येणार आहे. उन्हाळय़ात खूप तापमान असल्या कारणाने या स्पर्धा टोकियोबाहेर घेण्याचे ठरल्यावर बराच वाद निर्माण झाला होता. 

Related Stories

प्रमोद भगत, सुकांत कदम उपांत्य फेरीत

Patil_p

भारताची कांगारुंना सणसणीत चपराक!

Patil_p

जलतरणपटूंना दिल्लीत हलविण्याचा निर्णय

Patil_p

डीन एल्गारचे लक्ष कसोटी कर्णधारपदावर

Patil_p

बोल्ट, मिल्ने, नीशमचे चेन्नईत आगमन

Patil_p

‘लॅटव्हियाची ओस्टापेंको विजेती

Patil_p
error: Content is protected !!