तरुण भारत

आणखी एका ग्राहकाचे 1 लाख 60 हजार लांबविले

प्रतिनिधी/ बेळगाव

घर बांधण्यासाठी कॅनरा बँकेतून कर्ज घेतले. मात्र भामटय़ांनी त्यामधील 1 लाख 60 हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार बेळगावात घडला आहे. बनावट एटीएमच्या साहाय्याने ही रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बँकेला विचारले असता बँकेचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देत आहेत. बेळगाव परिसरातील अनेकांची रक्कम अशा प्रकारे लंपास करण्यात येत आहे. त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

एकलव्यनगर कणबर्गी येथील चांदबी हुसेनसाब मुलतानी यांनी घर बांधण्यासाठी कॅनरा बँकेमधून 2 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. ती रक्कम तशीच त्यांनी आपल्या खात्यावर ठेवली होती. त्यांच्याकडे एटीएम कार्ड होते. मात्र बेंगळूरमधील एका एटीएममधून 1 लाख 60 हजार रुपये लंपास केले आहेत. जनता प्लॉट, आश्रय कॉलनी येथे या कुटुंबाने घर बांधण्यासाठी कर्ज काढले होते. मात्र ही रक्कम गेल्यामुळे त्यांना धक्काच बसला आहे. आता आम्ही घर कसे बांधू? असे मुलतानी कुटुंब म्हणत आहेत. आम्हाला काहीही करून रक्कम द्या, अशी विनवणी ते कुटुंबीय बँक अधिकाऱयांकडे करत आहेत.

बोगस एटीएमच्या साहाय्याने गेल्या काही दिवसांमध्ये लाखो रुपयांची रक्कम बेंगळूर येथून लंपास करण्यात आली आहे. मात्र याबाबत बँक अधिकारी, पोलीस एक चक्कार शब्दही काढण्यास तयार नाहीत. कोरोनाच्या काळात जनता संकटात असताना अशाप्रकारे भामटे रक्कम लांबवत आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांतून भीती व्यक्त होत आहे. आम्ही कोणालाही आमचा कोड क्रमांक दिला नसताना अशा प्रकारे रक्कम लंपास होत असेल तर कुणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न करत आहेत.

पोलिसांनी आणि बँक अधिकाऱयांनी याबाबत गांभीर्य घेणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी भामटे फोन करून कोड क्रमांक घेत होते. मात्र आता कोड क्रमांक न घेता बोगस एटीएमच्या साहाय्याने ही रक्कम लंपास होत आहे. त्यामुळे ग्राहक कितीही जागरुक राहिला तरी देखील त्याला फटका बसू शकतो. तेंव्हा बँक अधिकाऱयांनी याची चौकशी करून तसेच गुप्त ठेवण्यात आलेले क्रमांक भामटे कसे मिळवत आहेत, याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास अनेकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Related Stories

धारवाड रोड सर्व्हिस रोडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Amit Kulkarni

सीमाप्रश्नासाठी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा

Patil_p

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

Rohan_P

खानापुरातील कार्यालयात निवडणुकीनंतर शुकशुकाट

Omkar B

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅलेट मशीन रवाना

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील पाऊस गायब झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

Patil_p
error: Content is protected !!