तरुण भारत

खानापुरात शेतीच्या कामामुळे लॉकडाऊन नको

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात सध्या भातरोप लागवडीची कामे तसेच इतर शेतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतीच्या कामामुळे तालुक्यात लॉकडाऊन करणे चुकीचे ठरेल, यामुळे कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन न करता सध्या असलेले दुकान व इतर व्यवहार सुरू ठेवण्याच्या वेळेत कपात करून आता दि. 31 जुलैपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू ठेवावीत, तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱया शेतकऱयांना तसेच शेतमजुरांना पोलिसांनीही विनाकारण त्रास करू नयेत. त्यांना सर्वप्रकारची मुभा द्यावी, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी शुक्रवारी ता. पं. कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अधिकारी, व्यापारी, गणेशोत्सवांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना केले.

Advertisements

यावेळी बोलताना आमदार अंजली निंबाळकर पुढे म्हणाल्या, खानापुरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तरी कुणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येकाने आवश्यकता भासली तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरावे तसेच सामाजिक अंतराचे भानही राखावे. त्या मृत कोरोना रुग्णाच्या हॉटेलचा परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. तसेच यावर्षीचे एकच वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न केलेला बरा, असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने सारासार विचार करून निर्णय घ्यावा, असे आवाहनही आमदार निंबाळकर यांनी केले.

प्रारंभी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश विशद केला. बैठकीला उपस्थित असलेल्या व्यापारी बंधूंनी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 ऐवजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत ठेवावीत, तसेच यामध्ये औषधांची दुकाने व दूध विक्री केंद्रांना सूट द्यावी, अशी मागणी केली. तर काहीनी पुढील आठ दिवस खानापूर शहरासह तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन करावा, अशी सूचना मांडली. तसेच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना महामंडळाने यावर्षी सरकारी नियमांचे शंभर टक्के पालन करून, दहा दिवस अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीत गुलाबजैन, प्रकाश चव्हाण, संजय कुबल, पंडित ओगले, शिवशंकर कट्टीमनी, प्रशांत खासनिस, शंकर सोनोळी, बाळासाहेब सावंत, दशरथ बनोशी, रवि काडगी, आप्पय्या कोडोळी, प्रकाश देशपांडे व इतरांनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला ता. पं. कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आडवीमठ, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक बसवगौडा पाटील, नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक यू. एस. आवटी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते..

Related Stories

अनुराधा पौडवाल यांची पंत महाराज मंदिराला भेट

Amit Kulkarni

रस्ते बंद.. कठोर निर्बंध

Patil_p

लग्न समारंभात दागिन्यांची बॅग पळविली

Patil_p

सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने बसवराज नरवाडे सन्मानित

Patil_p

कळसा-भांडुरासाठी शेतकऱयांचे पुन्हा आंदोलन

Patil_p

वरेरकर नाटय़ संघाच्या ‘एकपात्री नाटय़’ स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!