तरुण भारत

पूर्व अफगाणिस्तानमध्ये 10 तालिबान्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / काबुल : 

पूर्व अफगाणिस्तानमध्ये नॅशनल सिक्‍युरिटी फोर्सच्या तळावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला नॅशनल सिक्‍युरिटी फोर्सने जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीत 10 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात नॅशनल सिक्‍युरिटी फोर्सच्या सैन्याला यश आले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

पूर्व अफगाणिस्तानमधील गझनी येथील अस्फंदी भागात झालेल्या हल्ल्यात 6 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत तीन तालिबानी जखमी झाले आहेत. तर नागरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यातील हल्ल्यात चार तालिबान्यांना ठार करण्यात आले. 

दरम्यान, मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी मैवांड जिल्ह्यातील सरा बाघल भागातल्या चेकपोस्टवर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तीन पोलीस अधिकारी ठार झाले आणि अन्य चौघेजण जखमी झाले होते. 

Related Stories

भारताकडून मालदीवला 25 कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत

datta jadhav

कोरोनाला निष्प्रभ करणारा अँटीवायरल मास्क

Patil_p

5, 10, 100 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद

Patil_p

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 54.13 टक्के

datta jadhav

जर्मन नागरिकांना इशारा

Patil_p

‘कोरोना’ पोहोचला आता ब्रिटिश न्यायालयात

Patil_p
error: Content is protected !!