तरुण भारत

आग्रा : तानाजीनगर तीन दिवस पूर्ण बंद; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर होणार कारवाई

ऑनलाईन टीम / आग्रा : 


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आग्रामध्ये 55 तासांचे पूर्ण लॉक डाऊन पुन्हा एकदा जारी करण्यात आले आहे. आग्रामध्ये सोमवारी स्थानिक सुट्टी आहे. त्यामुळे आजपासून सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण बंद असणार आहे. 

Advertisements


जिल्हाधिकारी प्रभू एन सिंह यांनी सांगितले की, या तीन दिवसांच्या कालावधीत केवळ दूध आणि मेडिकलची दुकाने सुरू राहतील. सोमवारी कैलास मंदिरात जत्रा असल्याने स्थानिक सुट्टी असल्याने बाजारपेठ आणि कार्यालये बंद राहतील. 


या काळात बाहेर पडायला परवानगी नसेल. सर्व धार्मिक आणि अन्य स्थळे बंद असतील. कोणीही बाहेर पडू नये. जर कोणी विनाकारण बाहेर पडलेले आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच गरज पडल्यास बाहेर पडावे लागल्यास मास्क घालणे बंधनकारक आहे नाहीतर 500 रुपयांचा दंड केला जाईल, असेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

‘मिनिमम बॅलन्स’पासून एसबीआय ग्राहकांची सुटका

tarunbharat

उत्तराखंड : शहराच्या तुलनेत डोंगराळ भागात कोरोनाचा संसर्ग अधिक

Rohan_P

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार पार

Rohan_P

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

आसाम : 15 जूनपर्यंत वाढविला कोरोना कर्फ्यू!

Rohan_P
error: Content is protected !!