तरुण भारत

खनिज वाहतुकीमुळे मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड

लोकांत तीव्र नाराजी, अखेर वाहतूक रोखली

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले खरे, मात्र खनिज वाहतूक सुरू राहिल्याने लॉकडाऊनच्या निर्णयाचे गांभीर्य निघून गेले. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातूनच खनिज वाहतूक राजरोसपणे सुरू राहिल्याने लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरून खनिज वाहतुकीचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड सुरू झाली. अखेर लोकांनी रस्त्यावर उतरुन खनिज वाहतूक बंद पाडली.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व उपक्रम लॉकडाऊनच्या काळात बंद ठेवण्यात येईल, असे सरकारनेच जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून खनिज वाहतूक सुरू झाल्याने जनतेत संताप व्यक्त होऊ लागला. खनिजमाल वाहतूक अत्यावश्यक सेवेत येते का असा सवाल लोक करू लागले. त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही विचारणा होऊ लागली. सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर तर सोशल मीडियावरून तीव्र टीका झाली. गोवाभरातून या खनिज वाहतुकीबाबत लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकले.

लोकांना लॉकडाऊन, सरकारला लॉक आऊट?

या अगोदरही लॉकडाऊनच्या काळात मोठय़ा प्रमाणात खनिज वाहतूक केली गेली. बुधवारी जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या लॉकडाऊन काळात खनिज वाहतूक बंद राहील अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र शुक्रवारी लॉकडाऊनच्या पाहिल्याच दिवशी आमोणा ते शिरसई अशी खनिज खनिज वाहतूक सुरु झाली. लोकांना लॉकडाऊन आणि सरकारला लॉकआऊट काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

सरकारचे लॉकडाऊन कुणासाठी?

खनिज वाहतूक सुरू झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. सरकार पुरस्कृत लॉकडाऊन कुणासाठी असा प्रश्न लोक करू लागले. सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन बंधनकारक आहे. पण खाण कंपन्यांना लॉकडाऊन लागत नाही, का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. सरकार खाण कंपन्यांच्या आधीन झाले असले तरी नियम सर्वांसाठी समान आहे. मग असे असताना खनिज वाहतूक कशी सुरू झाली, असा संतप्त सवाल लोक करीत होते.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच खनिज वाहतूक खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच लॉकडाऊनची अंमलबजावणी होत नसेल तर अन्य भागात कशी होऊ शकते. सांखळी मतदारसंघातून भर लोकवस्तीतून हे ट्रक खनिज वाहतूक करतात. बाजारातून खनिज वाहतूक करण्यास कशी काय मान्यता दिली जाते. पावसाळय़ात खनिज वाहतूक केल्याने रस्त्यावर चिखल होत आहे. लालभडक पाणी रस्त्यावरून बाहेर फेकले जाते, पण तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नाही.

Related Stories

गोमंतक युवा भंडारी समितीतर्फे म्हापशात वनमहोत्सव

Omkar B

सांखळीचा नगराध्यक्ष आज ठरणार तीनजणांचे अर्ज दाखल

Omkar B

गोवा डेअरीच्या दुग्धवाहकांचा मनमानी कारभार

Omkar B

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा आविष्कार

Patil_p

म्हापशातही कोरोनाचा प्रवेश

Patil_p

मडगावातील स्वप्नील वाळके खून सुपारीतून?

Patil_p
error: Content is protected !!