तरुण भारत

बेंगळूर : एचएएलमध्ये १६० बेड्चे कोविड केअर सेंटर सज्ज

बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात ४ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने शुक्रवारी त्यांच्या जुन्या विमानतळ रोड परिसरामध्ये स्थापित केलेले १६० बेड्चे सुविधायुक्त कोविड केअर सेंटर बीबीएमपीच्या ताब्यात दिले आहे.

एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी या सर्व सुविधा १६ दिवसात तयार करण्यात आली आहे. संचालक आलोक वर्मा यांनी, सुरुवातीला या कोविड सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे म्हंटले आहे. एचएएल कॅम्पसमध्ये घाटगे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उभारण्यात आलेले कोविड सेंटर हे शौचालय, बाथरूम आणि इतर आवश्यक खोल्या अशा आधारभूत सुविधांनी सुसज्ज आहे.

एचएएलने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी चालू असलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत रूग्णालयात वापरण्यासाठी ३०० एरोसोल बॉक्स तयार केले आहेत. ते कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात अशा विविध राज्य सरकारांना हस्तांतरित केले आहेत.

एचएएलने म्हंटले आहे की बेंगळूरशिवाय लखनऊ, कानपूर, कोरवा, हैदराबाद, नाशिक आणि कोरापुट या सहा ठिकाणी ६०० पेक्षा जास्त बेड दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेंगळूर एचएएल कॅम्पस, ओल्ड एअरपोर्ट रोड येथे १६० बेड्चे उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर बीबीएमपीकडे सुपूर्द केलं आहे.

Advertisements

Related Stories

‘त्या’ प्रवाशांना बससहित धाडले माघारी

Amit Kulkarni

मानस फुटबॉल अकादमीकडे हल्याळ चषक

Amit Kulkarni

मनपा अर्थसंकल्पासाठी आयुक्तांनी घेतली बैठक

Patil_p

जिल्हय़ात 106 रुग्ण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

वळिवामुळे ज्वारीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

Amit Kulkarni

दहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनास प्रारंभ

Omkar B
error: Content is protected !!