तरुण भारत

वाई शहरात कडक टाळेबंदी

जिकडे पहावे तिकडे शुकशुकाट

प्रतिनिधी/ वाई

Advertisements

कोरोनाचा वाढत चालेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाची वाई शहरात कडक ताळेबंदी करण्यात आली आहे. वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी नेटके नियोजन केले आहे. सर्व रस्ते सुनेसुने दिसत होते. नागरिकांनी घरात रहावे बाहेर पडू नका असे आवाहन करणारी पालिकेची रिक्षा प्रबोधन करत फिरत होती. रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाईकराना धक्का बसला असून शहरातील एकाच कुटूंबातीले 7 जण बाधित तर तालुक्यातील एकूण 19 जण बाधित झाले आहेत.

वाई शहरात दुसऱयांदा लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शहरात पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेच्याच नागरिकांना इंधन ठरलेल्या वेळेत दिले जाते. शहरात कोणीही बाहेर फिरू नये, यासाठी वाई पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. शहरातील सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी, ब्राम्हणशाही, धोम कॉलनी यापैकी बहुतेक परिसर हा अगोदरच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आला आहे. टाळे बंदीत सर्व भाग आता पुन्हा कडक बंद पाळण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसतं होते.

रात्रीच्या अहवालात वाईकराना धक्का

रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाई तालुक्यातील 19 जण बाधित आढळून आले आहेत. त्यात वाई शहरातील ब्राम्हणशाही येथील एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच वाई शहरालगत असलेल्या यशवंतनगर ग्रामपंचायतीतील गुलमोहर कॉलनी एकाच कुटूंबातले 8  बाधित झाले आहेत.तर हॉट स्पॉट ठरलेल्या आसले येथे नव्याने 2 ,भुईंज 1 ,धोम पुनर्वसन (ओझर्डे) 1 असे बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती प्रांत कार्यलयातून देण्यात आली.

Related Stories

अवकाळी पावसाचा चांगलाच धुमाकुळ

Patil_p

सातारा : सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

दुकानांची वेळ रात्री आठ पर्यंत करणार पण निर्बंध कडकच – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 5,123 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64%

Rohan_P

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

जिल्हापरिषद शाळांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 मे पासून : शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची माहिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!