तरुण भारत

इराणमध्ये अडीच कोटी लोकांना बाधा

सरकारचीच कबुली, मृतांची संख्याही हाताबाहेर जाण्याची भीती, जगातील रुग्णसंख्या 1 कोटी 40 लाखापुढे

इराणमध्ये कोरोना विषाणूची बाधा अडीच कोटींहून अधिक लोकांना झाली आहे, अशी कबुली प्रत्यक्ष त्या देशाच्या अध्यक्षांनी दिली आहे. इराणची लोकसंख्या साडेपाच कोटी आहे. अध्यक्षांनी दिलेली माहिती खरी असल्यास या देशात 40 टक्क्मयांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसत आहे.

इराणमध्येही जगातील इतर देशांप्रमाणे कोरोना नियमावलीचा भंग करणाऱयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रसारावर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला अशक्मय होत आहे. लोकांनी हा आजार अत्यंत गंभीरपणे घ्यावा, नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आरोग्य विभागाचा अहवाल

इराणच्या आरोग्य विभागाने देशभरात व्यापक सर्वेक्षण काही दिवसांपूर्वी केले. या सर्वेक्षणात विभागाला आश्चर्यकारक आणि चिंताजनक माहिती मिळाली. आतापर्यंत जी रुग्णसंख्या घोषित करण्यात आली आहे ती प्रत्यक्ष रुग्णसंख्येच्या मानाने अल्प असल्याचे दिसून आले. कित्येकांना आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे असे लोक चाचणीसाठी उत्सुक नसतात. परिणामी बरीच मोठी रुग्णसंख्या नोंदणीच्या बाहेरच राहते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार इराणमध्ये आतापर्यंत अडीच कोटी रुग्ण निर्माण झाले आहेत. यापैकी अनेकांचा कोरोना औषधांशिवायच बराही झाला आहे. तथापि, रुग्ण इतक्मया मोठय़ा संख्येने वाढणे ही धोक्मयाची घंटा असून लोकांनीच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, असे अहवाल म्हणतो.

आगामी काळात वाढच होणार

येत्या काही महिन्यांमध्ये रुग्णसंख्या आणखी वाढून 3 ते साडेतीन कोटी होईल, अशीही शक्मयता इराणच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. अद्याप तेथील सरकारने हा अहवाल जनतेसाठी खुला केलेला नाही. देशात भीतीचे वातावरण निर्माण होईल, या शक्मयतेने तो गोपनीय ठेवण्यात आला आहे. तथापि, अध्यक्षांनीच त्याचा काही भाग खुला केल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

घोषित संख्या 2 लाख 70 हजार

इराणच्या अधिकृत आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 70 हजारहून जास्त आहे. तर मृतांची संख्या 14 हजारांहून अधिक आहे. तथापि, प्रत्यक्ष रुग्णसंख्या शंभरपट अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत मृतांची संख्याही घोषित आकडेवारीपेक्षा कित्येकपट जास्त असण्याची शक्मयता आहे. अनेक रुग्णांची चाचणीच न झाल्याने त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूचे कारण वेगळे देण्यात आले असावे, असेही अनुमान काढण्यात आले आहे.

उपायांवर भर देणार

रुग्णसंख्या कितीही असली तरी सरकार माघार घेणार नाही. शक्मय ते सर्व उपाय लोकांचा बचाव करण्यासाठी केले जातील. सर्व देशांनी एकमेकांच्या सहकार्याने या संकटाचा मुकाबला करणे आवश्यक आहे. इराण यासाठी विश्व समुदायाला आवाहन करीत आहे, असे या देशाच्या प्रशासनाने म्हटले आहे.

 स्थानिक संस्थांना अधिकार

लंडन : ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीला लागल्याने स्थानिक प्रशासकीय मंडळांना लॉकडाऊन घोषित करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. विशेषत: दुकाने आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी हे अधिकार आहेत. ज्या भागांमध्ये कोरोना अधिक प्रमाणात आहे, तेथे या अधिकारांचा वापर सढळ हस्ते करण्याची सूचना आहे. 1 ऑगस्टपासून लॉकडाऊन राष्ट्रीय पातळीवर शिथिल करण्यात येणार असला तरी स्थानिक प्रशासनांना हे अधिकार आहेत.

दिवसभरात 70 हजार रुग्ण

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच असून गुरुवार रात्र ते शुक्रवार रात्र या 24 तासांच्या कालावधीत 70 हजार 774 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यापूर्वीच्या 24 तासांत 77 हजार 499 रुग्ण वाढले होते. अमेरिकेत मास्कची सक्ती करावी की न करावी यावर बरेच वादंग माजले आहे. पण वाढती रुग्णसंख्या मास्कचा वापर करण्यास भाग पाडत आहे. अमेरिकेच्या 50 प्रांतांपैकी 41 प्रांतांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून 19 प्रांतांमध्ये मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

2 लाख कोटींचे पॅकेज

बर्लिन : युरोपियन महासंघाच्या संसदेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून कोरोनापासून बचावासाठी 2.1 लाख कोटी डॉलर्सचे पॅकेज घोषित केले जाणार आहे. या पॅकेजवर सदस्य राष्ट्रांमध्ये गरमागरम चर्चा सुरू असून या पॅकेजचे स्वरुप आणि प्रत्येक देशाचा वाटा यावर मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहे. फ्रान्स आणि जर्मनी या बलाढय़ राष्ट्रांनी पॅकेजचा जास्तीत जास्त वाटा उचलावा आणि यथातथा अर्थव्यवस्था असणाऱया सदस्य देशांना साहाय्य करावे, अशी अपेक्षा अनेक देश व्यक्त करीत आहेत. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

संसद अधिवेशन लांबणीवर

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोरोना उदेकाच्या कारणास्तव तेथील संसदेचे अधिवेशन दोन आठवडय़ांसाठी पुढे ढकलले आहे. ऑस्ट्रेलियातील दाट लोकवस्तीच्या व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथवेल्स या प्रांतांमध्ये बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. संसद सदस्य, त्यांचा कर्मचारीवर्ग आणि इतर साहाय्यक यांच्या हितासाठी तो घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिवेशनातही कोरोनाचाच विषय प्राधान्याने गाजणार आहे.

झिनजियांगमध्ये पुन्हा उदेक

बीजिंग : चीनमध्ये वुहान व इतर गजबजलेल्या शहरांमध्ये कोरोना आटोक्मयात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या झिनजियांग प्रांतात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. प्रारंभापासून या प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यल्प होता. दिवसाकाठी 2 किंवा 3 रुग्ण नोंद होत असत. आता ही संख्या 100 हून अधिक झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आतापासूनच कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला असून रुग्णसंख्या आटोक्मयात न आल्यास लॉकडाऊन अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

अँटीबॉडी चाचणी यशस्वी

लंडन : कोरोनावरील लस शोधण्यात आघाडीवर असणाऱया ब्रिटनमध्ये अँटीबॉडी चाचणीचा पहिला मानवी टप्पा यशस्वीरीत्या पार करण्यात आला आहे. बोटातून काढलेल्या थेंबभर रक्ताच्या आधारे ही चाचणी केली जाते. या चाचणीची अचूकता 98.6 टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात सोप्या पद्धतीने कोरोनाबाधेची चाचणी करणे शक्मय होणार असून अहवाल अवघ्या 20 मिनिटांत मिळणे शक्मय होईल. या पद्धतीवर आणखी प्रयोग होणार असून येत्या दोन महिन्यात निश्चित स्वरुपाचे परिणाम समोर येतील, अशी आशा आहे.

Related Stories

कोलंबिया : राजधानीत धोका

Patil_p

कोरोना महामारीमुळे अमेरिकेत बिकट स्थिती

Patil_p

इंडोनेशियात अडकले 33 भारतीय

tarunbharat

लामा प्राण्याद्वारे प्राप्त सुक्ष्म अँटीबॉडी प्रभावी

Omkar B

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के

datta jadhav

‘लॉकडाउन’ 2020 मधील शब्द

Omkar B
error: Content is protected !!