तरुण भारत

सांगलीत कोरोनाचे तीन बळी, नवे रूग्ण ४८

प्रतिनिधी / सांगली

जिल्हय़ात शनिवारी नवीन 48 रूग्ण वाढले तर दोनजण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 950 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 486 आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे. शनिवारी महापालिका क्षेत्रात 38 रूग्ण वाढले आहेत. तर तिघांचे कोरोनाने बळी गेले आहेत. येळापूर ता. शिराळा आणि ब्राह्मणपुरी-मिरज येथील व्यक्ती तर विश्रामबाग सांगली येथील महिलेचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बळींची संख्या 29 झाली आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात कहर सुरूच
गेल्या आठ दिवसापासून सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे मोठय़ा संख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. शनिवारी एकाचवेळी 38 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 28 रूग्ण वाढले आहेत. कुंटे मळा येथे दोन, कोल्हापूर रोड, पाटील नगर येथे एक, सावली निवारा केंद्र येथे चार, माधवनगर रोड येथे दोन, शिंदे मळा तीन, दत्तनगर येथे एक, सांगलीवाडी येथे एक, वानलेसवाडी येथे एक, गुजरबोळ येथे सहा, चौगुले प्लॉट येथे दोन, रमामातानगर येथे एक, विजयनगर येथे एक, दत्तनगर येथे तीन तर कुपवाड हद्दीत दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये यशवंतनगर येथे एक, व कापसे प्लॉट येथे एक रूग्ण वाढला आहे. मिरज शहरात आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये अंबिकानगर येथे तीन, माजी सैनिक वसाहत येथे एक आणि गणेश तलाव येथे एक असे रूग्ण वाढले आहेत.

कडेगाव, मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात रूग्ण वाढले
कडेगाव तालुक्यातील कडेगाव शहरात तीन आणि भिकवडी खुर्द येथे एक रूग्ण वाढला. मिरज तालुक्यातील बेडग येथे एक रूग्ण वाढला. पलूस तालुक्यातील बांबवडे येथे एक, नागठाणे येथे एक आणि मालवाडी येथे एक असे तीन रूग्ण वाढले. वाळवा तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. त्य़ामध्ये इस्लामपूर येथे एक आणि ऐतवडे खुर्द येथे एक रूग्ण वाढला आहे. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

  18 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 24 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये खणभाग सांगली येथील 78 वर्षीय व्यक्ती, सांगली येथील 85 वर्षीय महिला, वानलेसवाडी येथील 86 वर्षाची महिला, कलानगर येथील 65 वर्षीय व्यक्ती, काळे प्लॉट येथील 35 वर्षीय व्यक्ती, हरिपूर रोडवरील 43 वर्षीय व्यक्ती, शास्त्री चौक मिरज येथील 55 वर्षीय व्यक्ती, जत येथील 70 वर्षीय महिला, किल्लाभाग मिरज येथील 75 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील 44 वर्षीय महिला, नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, टिंबर एरिया येथील 55 वर्षीय व्यक्ती, मिरज  येथील 48 वर्षीय व्यक्ती, पांढरेवाडी ता. आटपाडी येथील 70 वर्षीय व्यक्ती  या 15 जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील 03 रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दोन जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शनिवारी अवघे दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या आता 486 इतकी झाली आहे.

जिल्हय़ातील तिघांचा मृत्यू
कोरोनाचा उपचार सुरू असताना तिघांचे शनिवारी मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील येळापुर येथील 38 वर्षीय व्यक्ती, मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील 87 वर्षीय व्यक्ती आणि सांगली शहरातील विश्रामबाग येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी गेला आहे. या तिघांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 29 जणांचे बळी गेले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण   950
बरे झालेले    435
उपचारात     486
मयत         29

Related Stories

सांगली : दिघंची महामार्गावर धुळीचे लोटच लोट

Abhijeet Shinde

वीज बिलावर दोन दिवसात निर्णय घ्या : राज ठाकरे

Rohan_P

महाराष्ट्रातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून; 75% उपस्थिती बंधनकारक नाही : उदय सामंत

Rohan_P

रक्षाबंधनानिमित्त पंकजा मुंडेंचा खास संदेश ; म्हणतात, बहिणींसाठी ‘एवढं’ केलत तरी मला आनंद

Abhijeet Shinde

दोन हजारची नोट झाली दुर्मिळ

Abhijeet Shinde

अहंकार सोडा अन्यथा सांगली जिल्ह्यातील कारखाने आजारी पडतील: राजू शेट्टी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!