तरुण भारत

सडोली खालसा येथे एक महिला पॉझिटिव्ह

वार्ताहर / सडोली खालसा

सडोली खालसा तालुका करवीर येथे आज 65 वर्षीय महिलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सडोली खालसा गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे.

ही महिला सांगाव ता.कागल. येते आपल्या नातेवाईकाकडे गेली होती तिथेच संबंधित नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या महिलेचा स्वॅब तपासणीचा देण्यात आला होता. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यानंतर फेर तपासणी अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हसूर दूमाला. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. टी. पोळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सर्वे व तपासनी करण्यात आली. ग्रामपंचायत.पोलीस पाटील. दक्षता समिती यांनी खबरदारी घेतली असून गावात औषध फवारणी करण्यात आली तसेच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.

Related Stories

रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष म्हणणाऱ्या दरेकरांना राष्ट्रवादीने दिलं उत्तर; “गाल आणि थोबाड…”

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गैरफायदा घेणार्‍या पुरवठादारांवर फौजदारी करा

Abhijeet Shinde

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे शतक

Patil_p

कोल्हापूर : इचलकरंजीत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ६ मृत्यू, १९७ नवे रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!