तरुण भारत

राजस्थानातील राजकीय वादळ: जादूगार विरुद्ध कलाकार

आपल्या वडिलांपासून जादू शिकलेल्या गेहलोत यांनी इंदिरा, राजीव, सोनिया आणि राहुल यांच्यावर एकप्रकारे आपली जादू चालवून राजस्थानमधील आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

गेल्या आठवडय़ातील राजकीय घटनांनी एक गोष्ट सिद्ध केली आहे की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे साधेसुधे जादूगार नाहीत. त्यांनी त्यांची खुर्ची बळकावण्याचा प्रयत्न करणाऱया सचिन पायलट यांना एक प्रकारे नाहीसेच केलेले आहे. पायलट यांची बंडखोरी त्यांच्यावर नुसतीच उलटली नाही तर त्यांना पळता भुई थोडी झाली आहे. एकेकाळी राहुल गांधींच्या ऐवजी काँग्रेसचे संभावित अध्यक्ष म्हणून गणले जाणारे राजेश पायलट यांना आता पुढे काय करायचे हे कळेनासे झाले आहे.

Advertisements

’तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले’ अशी पायलट यांची अवस्था झाली आहे. गेहलोत यांना पदभ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात पायलट यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले आणि त्यांना राज्य काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील नारळ देण्यात आला. भाजपची छुपी साथ घेऊन त्यांना सत्ताबदल घडवायचा होता आणि तो डाव त्यांच्यावर उलटल्याने आता आपली आणि आपल्या समर्थकांची आमदारकी कशी वाचवायची असा अजब पेच पायलट यांच्यापुढे पडलेला आहे.

सारा मामलाच जणू ‘अति झाले आणि हसू आले’ असा. 42 वर्षांचे पायलट मुख्यमंत्रीपदाकरता एवढे वेडे झाले की साम-दाम-दंड-भेद असे सारे प्रकार वापरून त्यांनी राजस्थान सरकारच पोखरावयास सुरुवात केली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींशी असलेल्या घनि÷ मैत्रीमुळे आणि फारूख अब्दुल्लांचे जावई असल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. आणि तेव्हापासून त्यांची गाडी बिनसलेली होती. पण राजकारणातील आपण मोठे कलाकार आहोत हा त्यांचा समज उगीचच दृढ झाला

चांगले व्यक्तिमत्व, प्रभावी भाषाशैली, फर्डे इंग्रजी आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये होणारी वाहवा यामुळे स्वतःवरच हुरळून गेलेल्या पायलट यांनी बंडाची जी मोहीम सुरू केली ती फसणारच होती. कारण त्यांनी ठीक तयारीदेखील केलेली नव्हती. होते. त्यांचे बंड म्हणजे पोरखेळ ठरला. गेले 18 महिने पायलट आणि गेहलोत यांच्यात साधा वार्तालाप होत नव्हता यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री सावध झाले होते आणि शांत राहून सावज पकडण्यासाठी त्यांनी सापळा लावला. त्यात पायलट अडकले नसते तरच नवल होते.

पक्षश्रे÷ाrना विश्वासात घेऊन गेहलोत यांनी एक जबर केस पायलट यांच्याविरुद्ध. बनवली. गेले सहा महिने ते भाजपशी कसे मिळाले होते याचे दाखले देण्यात आले. मांजर डोळे मिटून दूध पिते याचा अर्थ दुसऱयाला ही चोरी कळत नाही का? गेहलोत आणि भाजपच्या माजी मुख्यमंत्री  वसुंधराराजे  यांची चांगलीच राजकीय गट्टी आहे त्यामुळे राजे यांनी पायलटच्या बंडाला सुरुंग लावण्याचे काम भाजपांतर्गत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राजे यांचे राजस्थानमधील वजन कमी करण्यासाठी गजेंद्रसिंग शेखावत यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. पायलट आणि गेहलोत यांच्या भांडणाला एक व्यक्तिगत किनारदेखील आहे. गेहलोत यांचा असा ग्रह आहे की त्यांचा मुलगा वैभवच्या जोधपूरमधील पराभवाला पायलट हेच जबाबदार आहेत. आज ना उद्या गेहलोत वैभवला नेता बनवतील आणि आपली नेतागिरी संपुष्टात येईल अशी भीती पायलट यांना वाटते. गेहलोत हे किती घाग नेते आहेत हे पायलट यांना नीट कळलेच नाही अथवा  त्यांनी ते कळून घेतले नाही. चाळीस वर्षाहून जास्त काळ राजकारणात असलेल्या गेहलोत यांनी राहुल आणि प्रियांकाला बालपणी थोडी जादू शिकवली होती असे म्हणतात. आपल्या वडिलांपासून जादू शिकलेल्या गेहलोत यांनी इंदिरा, राजीव, सोनिया आणि राहुल यांच्यावर एकप्रकारे आपली जादू चालवून राजस्थानमधील आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. नटवरसिंग असोत की कै. राजेश पायलट, परसराम मदेरना अथवा इतर बरेच ज्ये÷ नेते. त्यांना राजस्थानच्या राजकारणात गेले दोन दशकाहून अधिक काळ गेहलोत यांनी निष्प्रभ केले. 1998 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री भैरवसिंह शेखावत यांचे एवढे पानिपत गेहलोत यांनी केले की भाजपमधील शेखावत युगच संपुष्टात आले. गेहलोत यांच्या विरोधात काँग्रेस अंतर्गत जे कोणी उभे राहिले ते एकतर बाजूला पडले किंवा पराभूत झाले. 10-12 वर्षापूर्वी त्यांच्या जागी मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने बघणारे सी. पी. जोशी यांचा केवळ एका  मताने विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता हेच जोशीसाहेब हे विधानसभेचे सभापती आहेत.  भाजप आणि केंद्र सरकारने सर्व प्रकारे साथ दिल्याने पायलट यांची फरफट अजूनच वाढली आहे. न्यायालयाचा दरवाजा ठोठावून त्यांनी एक प्रकारे काँग्रेसचा दरवाजा आपल्याकरता बंद केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांचे बंड राहुल गांधी यांना वर्मी लागले आहे असे म्हणतात. ‘मी लावलेल्या अमृताच्या झाडाला ही विषाची फळे कशी आली बरे?’ असेच ’अश्रूंची झाली फुले’ मधील प्राध्यापक विद्यानंद सारखे ते स्वगत म्हणत आहेत. मी हाताला धरून वर आणलेले सारे तरुण तुर्क पक्ष सोडून गेले तरी चालतील. त्याची आपल्याल्या पर्वा नाही असे राहुलनी एका पदाधिकाऱयांशी बोलल्याचे म्हटले जाते. ’ते गेले तर गेले पक्षात नवीन रक्ताला अजून वाव मिळेल’, हे राहुल यांचे विधान मोदी-शहा यांच्याकरता अवाप् करणारे आहे. येता आठवडा हा राजस्थान करता राजकीय धामधुमीचा राहणार आहे. काँग्रेस मधून भाजपने नेत्यांची जोरदार आयात चालविल्याने सत्ताधारी पक्षात हळूहळू अस्वस्थता वाढत आहे. एकीकडे आपण आत्मनिर्भरतेच्या गोष्टी करत असताना दुसरीकडे ही राजकीय आयात का बरे करत आहोत असे प्रश्न सत्ताधारी वर्तुळात अगदी हळू आवाजात विचारले जाऊ लागले आहेत.

सुनील गाताडे

Related Stories

नववर्ष गोंयकारांना कितपत सुखकारक ?

Omkar B

स्थानविशेष…..सुवचने

Patil_p

सर्वोच्च न्यायालयात पश्चिम घाटासाठी याचिका

Patil_p

‘अल्ला विट्ठला’चा कर्ता अभिजीत झुंजारराव

Patil_p

शेतकऱयांना चिंतामुक्त करा मायबाप!

Patil_p

महाराष्ट्राचा युपी, युपीचा महाराष्ट्र

Omkar B
error: Content is protected !!