तरुण भारत

सांगली : कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन, नेवरीत दोघांवर गुन्हे दाखल

प्रतिनिधी / कडेगाव

कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकारणी नेवरी (ता. कडेगाव) येथील शुभांगी अनिल शिंदे वय – 30 व अनिल शामराव शिंदे ( वय-34 दोघे रा.नेवरी ) यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका एस. ए. इंगळे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सर्वत्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तर तालुक्‍यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनास संशयित रुग्ण परिसर कंटेन्मेंटझोन जाहीर केले आहे. तर नेवरी येथे बाहेरगावहुन आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने विठ्ठलनगर नेवरी मळा हा परिसर प्रशासनाने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

दरम्यान शुभांगी शिंदे व अनिल शिंदे हे कोरोनाबधित रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या स्वॅबचा अहवाल घेण्यात आला होता. मात्र त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याना घरातच विलगिकरणात ठेवण्यात आले होते. तर अशा परिस्थितीत शनिवार (ता.18) रोजी शुभांगी व अनिल शिंदे हे दोघे कंटेन्मेंटझोनमध्ये असूनही ते प्रशासनासह कोणालाही न सांगता तेथून इतर ठिकाणी निघून गेले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

Related Stories

कोल्हापूर : चौदा वर्षे रखडलेली शिरदवाडची पाणीपुरवठा योजना तातडीने सुरु करा

Abhijeet Shinde

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

Abhijeet Shinde

वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यात यशस्वी झालो : माजी आमदार चंद्रदीप नरके

Abhijeet Shinde

डोंगरमाथ्यावरील धावलीत कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ट्रॉल्यांना अचानक आग

Abhijeet Shinde

सहाय्यक निरीक्षकास दोन दिवस कोठडी

Patil_p
error: Content is protected !!