तरुण भारत

हॉस्पिटलची जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी आणखी तीन इस्पितळांना भेटी देऊन पाहणी केली. ईएसआय, कॅन्टोन्मेंट व मिलिटरी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली असून कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता कोरोनाबाधित डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱयांवर उपचारासाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

Advertisements

या तिन्ही इस्पितळातील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली आहे. तेथील अधिकाऱयांशीही जिल्हाधिकाऱयांनी चर्चा केली असून सरकारच्या मार्गसूचीनुसार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या इस्पितळात आवश्यक तयारी करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका आदींचा कोरोनाविरुद्धचा लढा सुरू आहे. आता या कोरोना योद्धय़ांनाही कोरोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात येत आहे. 40 बेडची व्यवस्था असणाऱया कॅन्टोन्मेंट इस्पितळात डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱयांवर उपचार करण्यासाठी सदर इस्पितळ राखीव ठेवण्यात येणार आहे. ईएसआय इस्पितळात 25 व मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 50 बेडची व्यवस्था असून इतर बाधितांसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के. एच., जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बालकृष्ण तुक्कार आदी अधिकारी उपस्थित होते

Related Stories

हुतात्मा दिनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Patil_p

आता संसर्गजन्य आजारांचा फैलाव

Omkar B

माळमारुती पोलीस निरीक्षकांचे काम उत्तमच

Amit Kulkarni

चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक

Patil_p

सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आरटीओंची सूचना

Patil_p

भूमाफिया जोशात, करोडोंची जमीन घशात!

Amit Kulkarni
error: Content is protected !!