तरुण भारत

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासात 2250 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम /  लखनऊ : 


उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात प्रदेशात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच 2250 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकूण 18 हजार 256 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रमुख आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.

Advertisements

 
ते म्हणाले, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 19,845 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत 1146 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर शनिवारी कॅबिनेट मंत्री कमल रानी वरुण व आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा यांच्यासह एकूण 1986 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


तर राजधानी लखनऊ मध्ये रविवारी 224 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कॅबिनेट मंत्री कमल रानी वरुण यांनी त्यांना ताप आल्याने कोरोनाची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

मतदान दिवसाच्या 72 तास आधी बाईक रॅलींवर बंदी

Patil_p

कोल्हापूरची टेबल-टेनिसस्टार वैष्णवीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Sumit Tambekar

लिट्टी-चोखाचा मोदींनी घेतला आस्वाद

tarunbharat

लुटीतील मुख्य सूत्रधारासह फरारींचा सुगावा नाहीच!

Patil_p

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 23 मे पर्यंत वाढ; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा

Rohan_P

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!