तरुण भारत

कोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात रविवारी कोरोनाने शहरातील साळोखेनगर येथील 63 वर्षीय वृद्धा, हुपरी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. इचलकरंजीत चेघांचा तर तळसंदे आणि तासवडेत एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 52 झाली आहे. जिल्हय़ात कोरोना बळींचे अर्धशतक झाले आहे. रात्री 8 वाजेपर्यत 167 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची आजपर्यतची संख्या दोन हजार 310 वर गेली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Advertisements

कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळपर्यत 25 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. यामध्ये सम्राटनगर 3, विक्रमनगर 2, कसबा बावडा येथील 2, कदमवाडी 2, हॉस्पिटलमधील दोघे, उभा मारूती चौक शिवाजी पेठ, विश्वकर्मा सोसायटी जवाहरनगर, रेणू प्रेस्टिज शिवाजी उद्यमनगर, संभाजीनगर, मुक्त सैनिक वसाहत,, शिवाजी पार्क, राजारामपुरी, अंबाई टॅक, व्यंकटेश पार्क नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साने गुरूजी वसाहत, राजाराम चौक वाशी नाका, तेली गल्ली मारूती मंदिर, मंजाई सरपंचवाडा येथील प्रत्येकी 1 रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, रात्री 8 वाजता आलेल्या 57 पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये शहरातील 13 जणांचा समावेश आहे. यामध्ये कसबा बावडा 2, संभाजीनगर 2, जवाहरनगर 2, शाहूनगर, सरनाईक कॉलनी वाशीनाका, लक्ष्मीपुरीतील हॉस्पिटल, रूईकर कॉलनी आणि ताराबाई पार्क येथील रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हय़ात हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील 48 वर्षीय पुरूष, हुपरी येथील 52 वर्षीय पुरूष, इचलकरंजीतील षटकोन चौकातील 55 वर्षीय महिला आणि आवळे गल्लीतील 36 वर्षीय महिला आणि अन्य दोघांचा कोल्हापुरातील साळोखेनगर येथील 62 वर्षीय वृद्धेचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने 8 बळी घेतल्याने बळींची संख्या 53 झाली आहे. तासवडे येथील कोरोना र्पॉझिटिव्ह 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाब, किडनी विकार, मधुमेहही होता, अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.

शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यत 50 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळपर्यत अनुक्रमे 31, 21 आणि 18 असे 70 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात शिरोळ तालुक्यातील 4, महापालिका क्षेत्रात 25, करवीर तालुक्यातील 15, चंदगड तालुक्यातील 23, हातकणंगले तालुक्यातील 15, कागल तालुक्यातील 3, पन्हाळा तालुक्यातील 6, गडहिंग्लज तालुक्यातील 8, आजरा तालुक्यातील 2, भुदरगड तालुक्यातील 2 आणि अन्य जिल्हय़ातील 1 आहे. त्यानंतर आलेल्या 56 जणांत शहरातील 13 पॉझिटिव्ह आहेत.

रविवारी रात्री 8 पर्यतची आकडेवारी
दिवसभरातील पॉझिटिव्ह रूग्ण 167
आतापर्यत एकूण पॉझिटिव्ह रूग्ण   2310
दिवसभरातील कोरोनामुक्त  0
आतापर्यतचे कोरोनामुक्त 984
दिवसभरातील कोरोना बळी 8
आजपर्यतचे कोरोना बळी  54
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रूग्ण 847
स्वॅबचे आलेले तपासणी रिपोर्ट 631
पॉझिटिव्ह 167
निगेटिव्ह   488

Related Stories

कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस रविवारपासून धावणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मसाई पठाराच्या पायथ्याशी रस्ता खचला

Abhijeet Shinde

कोल्हापुरात साडेतीनशे महिलांना 55 लाखांची कोरोना मदत

Abhijeet Shinde

खाशाबांची पद्मविभुषण पुरस्कारासाठी शिफारस करणार

Abhijeet Shinde

चैत्री पोर्णीमेला जोतीबा यात्रेसाठी पुकळेवाडी वरुन निघालेल्या नंदीचे प्रस्थान थांबवले

Patil_p

कोल्हापूर : बिद्रीत सख्ख्या भावाचा खुरप्याने वार करुन खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!