तरुण भारत

सांगली : कोरोनाने चार बळी, रूग्णांची ‘हजारी’ पार

प्रतिनिधी / सांगली

रविवारीही कोरोनाचा जिल्हय़ात कहर सुरूच होता. नवीन 63 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रात 40 रूग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात 23 रूग्ण वाढले आहेत. जिल्हय़ातील रूग्णसंख्येने आता एक हजार आकडा पार केला आहे. सध्या उपचारातील रूग्णसंख्या 545 इतकी झाली आहे. रविवारी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने एकूण 33 बळी गेले आहेत.

Advertisements

 सांगली-मिरज आणि कुपवाड शहरात फैलाव
रविवारीही महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर मोठय़ाप्रमाणात झाला आहे. महापालिका क्षेत्रात 40 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 25 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरातील खणभाग येथे आठ रूग्ण वाढले आहे. तर रतनशीनगर येथे एक, संजयनगर येथे एक, शास्त्री चौक येथे तीन, गवळी गल्ली येथे एक, सांगलीवाडी येथे एक, अष्टविनायक चौक येथे एक रूग्ण वाढला आहे. घनश्याम नगर येथे एक, बायपास रोड येथे एक, भारती हॉस्पिटलमधील पाच स्टाफ, तर मिरज येथे 15 रूग्ण वाढले आहेत. कमानवेस येथील एक, समतानगर येथील एक, बेथेलहेम नगर येथे तीन रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता 332 झाली आहे.

दुधगाव, भोसे, विटा, मादळमुठीत रूग्ण वाढले
मिरज तालुक्यातील दुधगाव येथील आरोग्यसेवकाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दुधगाव येथे कोरोना रूग्णसंख्या चारने वाढली आहे. भोसे येथे दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर   कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे एक आणि आगळगाव येथे एक बाधित आढळून आला आहे. तासगाव तालुक्यात वायफळे आणि सावळज येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. खानापूर तालुक्यात विटा शहरात एक, वेजेगाव येथे तीन जाखिनवाडी येथे दोन आणि मादळमुठी येथे एक रूग्ण बाधित झाला आहे. वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक तर आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. शिराळा तालुक्यातील शिराळा शहरात एक आणि कुंभवडेवाडी येथे दोन बाधित आढळून आले आहेत.

17 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 24 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये  खणभाग सांगली येथील 78 वर्षीय व्यक्ती, सांगली येथील 85 वर्षीय महिला, वानलेसवाडी येथील 86 वर्षाची महिला, कलानगर येथील 65 वर्षीय व्यक्ती, काळे प्लॉट येथील 35 वर्षीय व्यक्ती, हरीपूर रोडवरील 43 वर्षीय व्यक्ती, शास्त्री चौक मिरज येथील 55 वर्षीय व्यक्ती, जत येथील 70 वर्षीय महिला, किल्लाभाग मिरज येथील 75 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील 44 वर्षीय महिला, नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, टिंबर एरिया येथील 55 वर्षीय व्यक्ती, मिरज  येथील 48 वर्षीय व्यक्ती, पांढरेवाडी ता. आटपाडी येथील 70 वर्षीय व्यक्ती  या 15 जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील 2 रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जिल्हय़ातील चौघांचा मृत्यू
कोरोनाचा उपचार सुरू असताना रविवारी चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मिरज तालुक्यातील बेळंकी येथील 34 वर्षीय व्यक्ती, मिरज शहरातील 48 वर्षीय आणि 65 वर्षीय व्यक्ती तर सांगली शहरातील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी गेला आहे. या चौघांच्यावर मिरजेतील कोरोना रूग्णालय आणि भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. रविवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 33 जणांचे बळी गेले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण   1013
बरे झालेले    435
उपचारात     545
मयत         33

Related Stories

सांगली जिल्हय़ात 35 जणांचा मृत्यू ,नवे 979 रूग्ण

Abhijeet Shinde

गांधीनगरसह परिसरातील कोरोना रुग्ण संख्या २१० वर

Abhijeet Shinde

शासनाच्या नियमानुसारच जिल्ह्यातील उद्योग सुरु राहतील : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीकडून समन्स, ६ जुलैला हजर राहण्याचे आदेश

Abhijeet Shinde

नृत्य परिषदेला रंगभूमी दिनी छत्रपतींचा आशीर्वाद

Abhijeet Shinde

सांगली : दिघंचीतील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!