तरुण भारत

सातारा : अँटीजन किटमुळे फास्ट टेस्टिंग : १०७ बाधित

प्रतिनिधी / सातारा

जिल्हय़ात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसऱया दिवशी जिल्हाभर लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद लाभला आहे. मात्र बाधितांची संख्या वाढ कमी होत नाही. कोरोनामुक्तीचा वेग वाढण्याची गरज असून आजमितीस 1,304 कोरोनामुक्त झाले असून रविवारी 19 जणांनी कोरोना वर मात केल्याने कोरोनामुक्तीने 1300 चा आकडा पार केला. सध्या 904 अँक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. आरोग्य विभागावर ताण वाढला असला तरी अँटीजन किट या फास्ट टेस्टिंगचा वापर जिल्हय़ात सुरु करण्यात आला असून त्यामुळे तपासणीची गती वाढली आहे.

Advertisements

मंत्रीमहोदयांकडून चेकपोस्टची पाहणी
दरम्यान, रविवारी मालखेड ता. कराड येथील सातारा सांगली हद्दीवरील चेकपोष्ट, कोल्हापूर नाका कराड, कराड शहर पेठ लाईन व सैदापुर येथील लॉकडावूनच्या परिस्थितीची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली व परिस्थितीचा आढावाही घेतला. जनता स्वंयस्फुर्तीने लॉकडाऊन पाळत आहे. ही चांगली बाब असून यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाला असल्याचो यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्हय़ात 3 हजार अँटीजन किट
कोरोना संसर्गाच्या वाढत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग अर्लट असून बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या टेस्टचा वेग वाढवण्यासाठी अँटीजन किटचा वापर करुन तपासणी सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली. जिल्हय़ात 3 हजार किट उपलब्ध झाल्या असून त्यातील दीड हजार जिल्हा रुग्णालयात तर 500 किट कराडला देण्यात आल्या आहेत. इतर तालुक्यांना 100 ते 150 च्या संख्येत त्याचे वाटप करण्यात आले आहे. आणखी अँटीजन किट मागण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्टिफिशयल मशीन ऑर्डर करण्यात आली असून ती देखील लवकर जिल्हय़ात दाखल होईल. त्यानंतर जिल्हय़ातच फास्ट टेस्टिंग सुरु होईल व त्यासाठी पुण्याला नमुने पाठवण्याची गरज राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तपासणींचा वेग वाढणार
बाधिताच्या अतिसंपर्कातील म्हणजेच हायरिस्क कॉटॅक्टमधील नागरिकांची तपासणी अँटीजन किटच्या माध्यमातून त्यांच्याच गावात, परिसरात करुन 15 मिनिटात रिपोर्ट कळत आहे. त्यामुळे हायरिस्कमधील नागरिकांना ताब्यात घेणे, त्यांचे रिपोर्ट पुण्याला पाठवून वाट पहाणे थांबणार आहे. त्यांना क्वारंटाईन न करता ही तपासणी करुन कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करता येणार असल्याचेही डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.

19 नागरिकांची कोरोना वर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात, कोरोना केअर सेंटरमधून 19 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. यामध्ये
सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षीय तरुण व 80 वर्षीय महिला, राधिका रोड सातारा 27,30,48 व 81 वर्षीय महिला, कण्हेर 65 वर्षीय महिला, बोरगाव 44 वर्षीय महिला,

खटाव तालुक्यातील वडुज 22 वर्षीय तरुण, वरुड 25 वर्षीय तरुण.

माण तालुक्यातील गोंदवले बु. 20 व 24 वर्षीय तरुणी व 16 व 27 वर्षीय तरुण, मार्डी 60 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील पसरणी दोन पुरुष,वाई शहर एक पुरुष व महिला यांचा समावेश आहे.

जावलीतील त्या 76 पैकी 26 बाधित
जावली तालुक्यातील 76 जणांना हायरिस्कमधील म्हणून ताब्यात घेवून त्यांचे स्वॉब 15 तारखेला घेण्यात आले होते. मात्र दोन तीन दिवस उलटून देखील त्यांचे रिपोर्ट लटकले होते. हे सर्वजण क्वारंटाईन असले तरी त्यांच्या बरोबर इतरांना धोका होता. रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याबाबत तरुण भारत ने आवाज उठवून प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रकाश टाकला होता. आता या 76 जणांपैकी 26 जणांचे रिपोर्ट बाधित आले आहेत. त्यामुळे रिपोर्ट येण्यातील दिरंगाई टाळून फास्ट टेस्टिंगची पध्दत प्रशासनाने राबवण्याची गरज आहे. नाहीतर क्वारंटाईन सेंटरमध्येमध्ये संसर्ग साखळय़ा निर्माण होवू शकतील.

कराड तिसरा व्यापारी बाधित
कराड शहरात यापूर्वी यशवंत हायस्कूल आणि दत्त चौक या रस्त्यावरील दोन व्यापारी बाधित झाले होते. शनिवारी रात्रीच्या रिपोर्टमध्ये यशवंत हायस्कूल परिसरात टेलरिंग दुकान असणारा व्यापारी पॉझिटिव असल्याचा अहवाल आला आहे. या व्यापाऱ्याचे घर मंगळवार पेठेत असून तो परिसर सील करण्यात आला आहे. यशवंत हायस्कूल ते दत्त चौक या अर्धा किलोमीटरच्या परिसरात तीन व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

वनवासमाचीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री
सुरवातीच्या टप्प्यात तब्बल 39 रुग्ण सापडून वनवास भोगलेल्या कराड तालुक्यातील वनवासमाची गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रवास करून आलेला एक जण येथे बाधित सापडल्याने पुन्हा एकदा येथे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. गेले महिनाभर वनवासमाची मुक्त होऊन येथील जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तर कराड तालुक्यातील येळगाव येथे खाजगी प्रॅक्टिस करणारा एक डॉक्टर बाधित झाला असून त्यांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरणात ठेवले आहे.

शनिवारी रात्रीच्या अहवालात 76 बाधित
काल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिह्यातील प्रवास करुन आलेले 2, निकट सहवासित 53, सारी 11 आणि इतर 1 आणि विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्ट किटद्वारे 9 असे एकूण 76 संशयितांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर शिरवळ ता. खंडाळा येथील 90 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

वाई तालुक्यात 12, सातारा 8
यामध्ये वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 27, 49 वर्षीय पुरुष, पोलिस वसाहत येथील 65, 4, 30, 4, 18 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, सिद्धार्थवाडी 68 वर्षीय पुरुष, बोपेगाव 51 वर्षीय महिला, शेंदुरजणे 39, 40 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे 61 वर्षीय महिला, कोडोली 10, 8 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, नागठाणे 47 वर्षीय महिला, कण्हेर 40, 45, 35 वर्षीय महिला.

कराड तालुक्यात 12 बाधित
कराड तालुक्यातील शामगाव 53 वर्षीय पुरूष, वनवासमाची 60 वर्षीय पुरुष, येळगाव 38 वर्षीय पुरुष, मलकापूर 35 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, चचेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, आटके 34 वर्षीय पुरुष, तारुख 2, 2 वर्षीय बालिका, सैदापूर 54 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

खंडाळय़ात 5, पाटण 7, खटाव 1
खंडाळा तालुक्यातील जावळे येथील 57 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील अनपटवाडी येथील 1, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 31, 22 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील वडूज येथील 29 वर्षीय पुरुष, डिस्कळ येथील पुरुष. पाटण तालुक्यातील तारळे येथील 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, मिरगांव येथील 18 वर्षीय महिला, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय पुरुष, आंमवडे येथील 15 वर्षीय पुरुष, 25, 65 वर्षीय महिला,

फलटण तालुक्यात 15, माण 6
फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी 53, 25 वर्षीय पुरुष, 42, 22 वर्षीय महिला, साखरवाडी 43, 15, 50, 16 वर्षीय पुरुष, 38, 43, 18, 65 वर्षीय महिला, उपळवे येथील 26 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, महतगल्ली येथील 45 वर्षीय पुरुष. माण तालुक्यातील राजवडी 37 वर्षीय पुरुष, 28, 12 वर्षीय महिला, गोंदवले (बु) येथील 21 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 2,289
एकूण मुक्त 1, 304
एकूण बळी 81
उपचारार्थ रुग्ण 904

रविवारी
एकूण बाधित 09
एकूण मुक्त 19
एकूण बळी 01

Related Stories

‘त्या’ दोन मेडिकल स्टोअर विरोधात तक्रार दाखल

triratna

शिक्षक मतदार संघातून अनेक मातब्बर उमेदवारांची माघार

triratna

बाजारपेठेत उडाली खरेदीसाठी झुंबड

Patil_p

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,051 रुग्ण बरे!

Rohan_P

बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी कोरोना बाधित

triratna

वाई बाजार समितीचा भाजीपाला थेट जनतेच्या दारात

Patil_p
error: Content is protected !!