तरुण भारत

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान मिळावे

प्रतिनिधी / सातारा

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 10 रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला 30 रू. दर द्यावा या मागण्यांसाठी आज भारतीय जनता पार्टी सातारा शहर यांचे वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटांत सापडला असून दुधाचे भाव 16 ते 18 रूपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठरावीक दूध संघापूरतीच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे या बाबत चे निवेदनात उल्लेख करण्यात आले आहे

Advertisements

Related Stories

साताऱयात कंटेन्मेंट झोनवर पोलीस बंदोबस्त

Patil_p

जिल्हय़ाच्या 325 कोटीच्या आरखडय़ास मंजुरी

Patil_p

सातारा : नागठाण्यात युवकांकडून कासवास जीवदान

triratna

बार्शी आणि वैराग शहर पंधरा दिवस लॉकडाउन

triratna

वाई तालुक्यातील शिरगाव येथील केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्था चेअरमन निवड बिनविरोध

triratna
error: Content is protected !!