तरुण भारत

कोल्हापूर : गोकुळचे दुध संकलन सुरू राहणार

विभागीय उपनिबंधकांच्या पत्रानंतर गोकुळचा निर्णय

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

गोकुळने मंगळवारी, २१ जुलै रोजी दूध संकलन चालू ठेवावे. अन्यथा संघावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दुग्ध विभागाचे प्रभारी विभागीय उपनिबंधक परब यांनी काढली होती. त्यानंतर गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संकलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी या बाबतची तक्रार केली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला दर मिळावे यासाठी २१ जुलै रोजी एकदिवसीय राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला गोकुळ दूध संघानेही पाठिंबा दिला होता. त्यानुसार गोकुळ दूध संघाकडून मंगळवारी सकाळचे दुध संकलन होणार नाही असे सांगण्यात आले होते. यावर गोकुळ दूध संघाने दूध संकलन बंदचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी यासंदर्भात विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गोकुळला नोटीस काढली असून मंगळवारी दूध संकलन चालू ठेवण्याविषयी कळविले आहे.

शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. दूध संघ शेतकऱ्यांचा आहे म्हणून पाठिंबा दिला होता – रविंद आपटे, चेअमन गोकुळ.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 215 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

सोलापूर : मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

Abhijeet Shinde

महागाई विरोधात आ. पी. एन. पाटील यांची पदयात्रा

Abhijeet Shinde

हे राज्य ठोकशाहीचे

Patil_p

कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली

Abhijeet Shinde

साताऱयात दत्त जयंती रक्तदानाने साजरी

Patil_p
error: Content is protected !!