तरुण भारत

हिमाचल प्रदेशात 25 टक्के बस भाडे वाढविण्यास मंजुरी

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने कोविड -19 महामारीच्या संकटात फंडच्या कमतरतेमुळे राज्यात बसभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीत 25 टक्के बस भाडे वाढवण्यात आले आहे. पहिल्या तीन किलोमीटरच्या अंतरासाठी 5 रुपयांऐवजी आता 7 रुपये घेतले जाणार आहेत. यासोबतच सूचना आणि प्रौद्योगिकी विभाग कॅबिनेट मीटिंग देखील आता पेपरलेस केल्या जाणार आहेत. तर शिक्षा विभागात कार्यरत ईजीएस आता ग्रामीण विद्या उपसकात बदलेले जाणार आहेत. 


मंत्रिमंडळाने एमपी आणि एमएलए च्या रस्त्यावरील बसमधील निःशुल्क सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. 38 जुन्या ॲम्ब्युलन्स रिप्लेस करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण मंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले की, आम्ही बाहेरील राज्यांपेक्षा कमी भाडेवाढ केली आहे.

 
डिझेलच्या किंमती वाढल्याने भाडेवाढ करणे गरजेचे होते. तसेच अभियोजन विभागात अनुकंपा तत्त्वावर जेओए आयटीची तीन पदे भरली जाणार आहेत. तसेच शिक्षण संस्थांच्या पुस्तकालयामध्ये सहाय्यक  लायब्ररियनचे 771 रिक्त पदे कनिष्ठ कार्यालय सहाय्यकमध्ये बदलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. 

Related Stories

महात्मा गांधींनाही हवा होता नागरिकत्व कायदा

Patil_p

जेट एअरवेजला मिळाला नवा मालक

Patil_p

कोरोना व्हायरसमुळे केरळमध्ये ‘राज्य आपत्ती’ घोषित

prashant_c

राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरतेचा डाव

Patil_p

बिहारमध्ये 1,081 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

रशियाने कोरोनावरील लसीला दिली अधिकृत मंजुरी

datta jadhav
error: Content is protected !!