तरुण भारत

हरिश्चंद्र गडावर नव्या फुलवनस्पतीचा शोध

वार्ताहर/राजापूर

सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील हरिश्चंद्र गड (जि.अहमदनगर) परिसरामध्ये ‘पिंदा श्रीरंगी गोसावी व चांदोरे’ या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीचा शोध लागला आहे. ही फुलवनस्पती कोशंबीर कुळातील असून ह्या वनस्पतीचा गण ‘पिंदा’ हा उत्तर सह्याद्री डोंगर रांगेत प्रदेशानिष्ठ आहे. ‘पिंदा’ या गणात या अगोदर फक्त ‘पिंदा कोंकणेसीस’ ही एकच प्रजाती होती. मात्र, या नव्या संशोधनामुळे आता दुसऱया प्रजातीची नोंद झाली आहे. स्वीडन येथून प्रकाशित होणाऱया नॉर्डीक जनरल ऑफ बॉटनी या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाच्या माध्यमातून नोंद झाली आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी.आर्टस व आर. वाय. के. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथील वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी निलेश माधव, रयत शिक्षण संस्थेच्या राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.अरूण चांदोरे, त्यांचा संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे यांच्या दोन वर्षाच्या संशोधनानंतर या नव्या फुल वनस्पतीचा शोध लागला आहे.

हरिश्चंद्र गड व परिसरामध्ये फिरत असताना डॉ.गोसावी आणि सहकाऱयांच्या नजरेस ही वनस्पती पडली. त्यानंतर, त्यांनी वनस्पतीचे संशोधन आणि अभ्यास केला असता या नव्या फुलवनस्पतीचा शोध लागला. हरिश्चंद्र गड परिसरातील अहमदनगर आणि नशिक भागामध्ये या वनस्पतीचे संशोधन करण्यात आले. उभ्या कातळावर वाढणाऱया या वनस्पतीची उंची 1 ते 1.5 मीटर असून त्याची पाने 50 ते 90 सेंमी लांबीची पांढऱया रंगाची आकर्षक आहेत. पानाच्या देठावर आणि खोडावर गडद रंगाच्या रेषा आहेत.

या फुलवनस्पतीच्या संशोधनास नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाने मदत केली. या संशोधनास गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी.व आर.वाय.के. महाविद्यालय, नाशिकचे प्राचार्य डॉ.व्ही.एन. सुर्यवंशी, आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी.पवार, डॉ.बी.आर.कांगुणे, डॉ.एन.एल.जाधव, प्रा.एस.जी.मेंगाळ आदींचे सहकार्य लाभले. नव्याने संशोधित झालेली फुलवनस्पती विशिष्ट उंचीवरच्या उभ्या कातळावर हरिश्चंद्र गड येथे सापडत असून दुर्मिळ आहे. त्यामुळे तिचे तातडीने संवर्धन व्हावे असे मत प्रा.डॉ.अरूण चांदोरे आणि प्रा.डॉ. कुमार विनोद गोसावी यांनी व्यक्त केले आहे.

Advertisements

Related Stories

बंदी काळातील तोटा फुलविक्रेत्यांनी काढला गणेशोत्सवात भरुन

Patil_p

राष्ट्रीय कुटुंब अनुदान योजनेमधील दारीद्रय रेषेखालीची अट रद्द करावी

NIKHIL_N

रत्नागिरीत यंत्रणा अलर्ट!

Patil_p

लांजा तालुक्यातील शिवसेनेकडून कोरोना आपत्तीसाठी निधी

Patil_p

हापूस निर्यातीमधील अडचणी सोडवण्यासाठी ‘वॉररुम’!

Patil_p

कोकण मार्गावर २ ऑक्टोबर पासून राजधानी एक्सप्रेस धावणार

Shankar_P
error: Content is protected !!