तरुण भारत

बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी कोरोना बाधित

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांना कोरोना या आजाराची लागण झाली असून आता ते जगदाळे मामा हॉस्पिटल ठिकाणी उपचार घेत असून प्रकृती अत्यंत उत्तम आहे. आणि लवकरच घरी सोडणारआहेत अशी माहिती खुद्द नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी सोशल मीडियावरती बार्शीकर यांना दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये बार्शीकर यांचे आभार मानले असून त्यांनी या काळामध्ये बार्शीच्या नागरिकांनी दिलेले प्रेम याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना साश्रु नयनांनी आभार मानले.
यावेळी त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या व्हिडिओ मध्ये कोरोना आजार याविषयी माहिती दिली आहे, असिफ तांबोळी यांचा कोरोना अहवाल दिनांक 13 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते.

त्यांनी कोरोनाबाबत आपले अनुभव सांगताना सांगितले की, कोरोना हा आजार गंभीर अजिबात नाही हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि यासाठी फक्त आपली मानसिक ताकद चांगली असणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन आहार पौष्टिक आहार असणे गरजेचे असून दिवसभर गरम पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आयुर्वेदिक औषध, काढा आणि आपले प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असणाऱ्या गोळ्या या नियमित सेवन केल्या तरी कोरोना हा आजार आपल्याला होऊ शकत नाही. आणि जरी झाला तर तो लवकर बरा होतो. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की मला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अनेकांचे फोन आणि मेसेज आले. या सर्वांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या असणाऱ्या भावना याबाबत मी बार्शीकर यांच्या हमेशा ऋणी राहील अशी भावना व्यक्त करत साश्रू नयनांनी बार्शीकर यांचे आभार मानले.

Related Stories

महाराष्ट्रात 16,867 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

आजरा सूतगिरणीनजीक अपघात ; एकाचा मृत्यू

triratna

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात बुधवारी 23,179 नवे रुग्ण; 84 मृत्यू

Rohan_P

सवडीने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर

triratna

जिह्यातील रूग्णसंख्येचा आकडा अडीचशे पार

triratna

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन!

triratna
error: Content is protected !!