तरुण भारत

छोटय़ा व्यापाऱयांचे 15.5 लाख कोटींचे नुकसान

केटची माहिती : 20 टक्के दुकाने बंद होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोविडमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱया प्रत्येक क्षेत्राला फटका कमी अधिक बसतोच आहे. यामध्ये देशातील लहान व्यापाऱयांना 100 दिवसांमध्ये 15.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (केट)केला आहे.

ग्राहकांची रोडावलेली संख्या, आर्थिक अडचण आणि वित्तीय दावे पूर्ण करण्याच्या ओझ्यामुळे लहान क्यापारी मोठय़ा प्रमाणात तणावात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आतापर्यत कोणतेही समर्थन देण्याची योजना आखण्यात आली नसल्यानेही व्यापारी चिंतेत असल्याचे केटने म्हटले आहे.

देशामध्ये व्यवसाय सध्याच्या घडीला सर्वात कठीण प्रसंगातून प्रवास करीत आहेत. सदर क्षेत्राला दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर नाविन्यपूर्ण उपाययोजना आखण्याची गरज असून या घडीला देशातील 20 टक्के किरकोळ दुकाने बंद होण्याची भीती केटचे प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे.

व्यापारी संघटनेच्या माहितीमधून या कठिण कालावधीत व्यापाऱयांना मदतीची गरज असून एक वित्तीय योजना गरजेची आहे. यामध्ये व्यापाऱयांना व्यवसाय कर्ज, कर भरण्यात सवलत, बँकांच्या कर्जाचे पूर्नपेमेन्टचा विस्तार, विना व्याज आणि दंडाच्या रक्कमेत सवलत देण्यावर विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

16 फर्म्सनी ‘आयपीओ’तून उभारले 31 हजार कोटी

Omkar B

इपीएफओकडून 73.58लाख केवायसी अपडेट

Patil_p

शेअर बाजार विक्रमी स्तरावर, सेन्सेक्स 48 हजारावर

Patil_p

2022 मध्ये दागिन्यांची मागणी वाढणार

Patil_p

लॉकडाऊनमध्ये नैसर्गिक गॅस उत्पादन 18.6 टक्क्मयांनी घटले

Patil_p

‘मारुती’ची कार खरेदी होणार आणखीन सोपी

Patil_p
error: Content is protected !!