तरुण भारत

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सुमारे 77 लाखांचा दंड वसूल

प्रतिनिधी /  सोलापूर

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यात सुमारे  77 लाख 7 हजार 480 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्वात 10 लाख 52 हजार 580 रूपये हे मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत, यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 ते 20 जुलै 2020 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास,  निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 35650 प्रकरणात 58 लाख 26  हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 9823 प्रकरणात 14 लाख 38 हजार 400 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3272 प्रकरणात 4 लाख 42 हजार 580 रुपयांचा दंड वसूल केला.

मास्क न वापरणाऱ्या 10 हजार 226 जणांकडून 10 लाख 52 हजार 580 रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल दुचाकीवर दोघांनी प्रवास केलेल्या 787 जणांकडून 3 लाख 57 हजार 500 रूपयांचा दंड वसूल झाला आहे. दुचाकीवर तिघांनी प्रवास- वसूल केलेली रक्कम 10 हजार 500 रूपये, तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती- सात हजार रूपये, चार चाकी वाहनात चारपेक्षा अधिक व्यक्ती-40 हजार 900 रूपये, निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवलेले- 76 हजार 500 रूपये, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती-65 हजार 500 रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- 59 हजार 900 रूपये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केलेले- 66 हजार 100 रूपये, मास्क न लावणारे विक्रेते- 36 हजार 700 रूपये आणि सार्वजनिक ठिकाणी दारू-पान-तंबाखू सेवन- एक लाख पाच हजार 600 रूपये असा दंड वसूल करण्यात आला आहे.  

Advertisements

Related Stories

घटनादुरुस्ती हाच शेवटचा पर्याय

Abhijeet Shinde

बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी सातारा पालिकेचे परफेक्ट नियोजन

Patil_p

साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

Abhijeet Shinde

शाहूपुरीतील पाणी गळतीने हजारो लिटर पाणी वाया

Patil_p

महाराष्ट्रात बाधितांच्या संख्येत घट; गेल्या 24 तासात 14,452 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

साताऱयात जुगार अड्डय़ांवर धाडी; सहाजणांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!