तरुण भारत

चोवीस तासात ‘40 हजार’पार

देशात कोरोनाबाधितांचा उच्चांक : ओलांडला 11 लाखांचा टप्पा, 681 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात कोरोनाचे थैमान सुरुच असून सलग पाचव्या दिवशी तीस हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 425 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 681 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 043 एवढी झाली आहे. 7 लाख 87 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण 27 हजार 497 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहचण्यासाठी 110 दिवस लागले होते. तर एक लाखांपासून आठ लाखांपर्यंत रुग्णसंख्या पोहचण्यासाठी 53 दिवस लागले होते. मात्र, त्यानंतर रुग्ण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या तीनच दिवसात एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असूनही देशात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. मागील सलग चार दिवशी 32 ते 38 हजारपर्यंत रुग्ण आढळले होते. त्यानंतर सोमवारी त्यात आणखी वाढ होऊन 40 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर

देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात संक्रमण होत असून या राज्यात जास्त रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढत आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांहून अधिक झाले आहे. सोमवारपर्यंतच्या चोवीस तासात 22 हजार 664 रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

महाराष्ट्रात मृतांचा आकडा 12 हजारांसमीप

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 हजार 854 झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 9,518 कोरोनारुग्ण नोंदले गेले. राज्यात दिवसभरात 258 जणांचा मृत्यू झाला. टाळेबंदीसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

महाराष्ट्र, दिल्लीत मृतांचा आकडा सर्वाधिक

देशात एका दिवसातील मृतांचा आकडा सध्या सहाशे ते सातशेच्या आसपास असल्याचे आकडेवारीतून दिसते. सोमवारपर्यंत मागील 24 तासात 681 बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 258, तामिळनाडूतील 78, दिल्लीतील 31, पश्चिम बंगालमधील 36, उत्तर प्रदेशमधील 38, गुजरातमधील 20, कर्नाटकातील 91 जणांचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांपैकी महाराष्ट्रातील आकडा (11,854) सर्वाधिक असून त्याखालोखाल दिल्ली (3,628), गुजरात (2,142), तामिळनाडू (2,481), कर्नाटक (1,331), उत्तर प्रदेश (1,146) आणि पश्चिम बंगाल (1,112) या राज्यांचा क्रमांक लागतो.

Related Stories

आसाम-मिझोराममधील हिंसाचारात 6 पोलीस ठार

Patil_p

तामिळनाडूत काँग्रेसची ‘जम्बो टीम’, चिदंबरम नाराज

Patil_p

बिहारमध्ये आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार : नितीश कुमार

Rohan_P

मल्ल सुशील कुमारला 6 दिवसांची कोठडी

Patil_p

PM मोदी घेणार ओमिक्रॉनचा आढावा

datta jadhav

आधी विशेष जेवणाची मागणी आता सुशील कुमारला हवाय जेलमध्ये टीव्ही

Abhijeet Shinde
error: Content is protected !!