तरुण भारत

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

दुबई / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने अखेर यंदाची ऑस्ट्रेलियातील आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. या घोषणेमुळे बीसीसीआयला आता या कालावधीत आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisements

‘यंदा ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा कोव्हिड-19 च्या समस्येमुळे लांबणीवर टाकली जात आहे’, असे आयसीसीने सोमवारी पत्रकातून नमूद केले. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, दि. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ही टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार होती. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच 16 संघांचा सहभाग असणारी ही स्पर्धा अगदी बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवणे देखील शक्य होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. आयसीसीने याबाबत थांबा व प्रतीक्षा करा अशी भूमिका घेतली. पण, कोव्हिड-19 चे अस्मानी संकट नेस्तनाबूत होण्याची चिन्हे प्रदीर्घकाळ दिसत नसल्याने त्यांना अखेर एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्यानंतर यामुळे भारतातच होणाऱया 2023 वनडे विश्वचषक स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत पुढे टाकण्यात आली आहे. यामुळे या स्पर्धेच्या पात्रतेसाठी अधिक कालावधी प्राप्त होऊ शकणार आहे. 2023 मधील ही भारतातील विश्वचषक स्पर्धा मार्च-एप्रिलमध्ये खेळवली जाणार होती.

Related Stories

वूरकेरी रमणचा शॉला पांठिंबा

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिलनं भालाफेकमध्ये रचला इतिहास

Abhijeet Shinde

डु प्लेसिसच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला आघाडी

Patil_p

बांबोळीत आज मुंबई सिटीची लढत एससी ईस्ट बंगालशी

Patil_p

निसांका, थिरिमने यांची दमदार अर्धशतके

Amit Kulkarni

मुंबई सिटीची लढत आज नॉर्थईस्ट युनायटेडशी

Patil_p
error: Content is protected !!