तरुण भारत

मडगावचे न्यू मार्केट ठरल्याप्रमाणे बंद

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावातील न्यू मार्केट ही मुख्य बाजारपेठ सोमवारपासून ठरल्याप्रमाणे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र मार्केटला भिडून असलेली काही दुकाने खुली होती. गांधी मार्केट बाजारपेठ खुली असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी या बाजारात तसेच काही सुपर मार्केट्समध्ये गर्दी केल्याचे दिसून आले.

Advertisements

सकाळपासून न्यू मार्केटातील दुकाने व्यापाऱयांनी स्वेच्छेने बंद ठेवली. येथील ट्रेडर्स असोसिएशन व व्यापारी संघटना अशा दोन्ही संघटनांनी मार्केटच्या सभोवतालील परिसरात असलेल्या दुकानदारांनी स्वेच्छेने या लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. मात्र यातील काहींनी सहभाग दर्शविला, तर अन्य दुकाने खुली राहिल्याचे दिसून आले.

रविवारी सायंकाळी ही बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. न्यू मार्केटमधील एका हॉटेलचा मालक व बाजारपेठेच्या आंत एका बिस्कीटविक्री करणाऱया दुकानातील कॅशियर कोविड पॉझिटिव्ह मिळणे हे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यामागील एक कारण होते.

आज न्यू मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण

सोमवारी सकाळी न्यू मार्केटमधील जे व्यापारी नासणारी उत्पादने वा पदार्थ विकत होते त्यांनी आपला माल काढून नेल्याची माहिती व्यापारी संघटनेच्या देविदास बोरकर यांनी दिली. पालिकेकडून न्यू मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी ते शक्मय झाले नसल्याने आज मंगळवारी हे निर्जंतुकीकरण करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

श्रावणमासाला आजपासून प्रारंभ होत असल्याने फळ-भाजी खरेदीसाठी गांधी मार्केटमध्ये जाण्यास ग्राहकांनी पसंती दिली. कडधान्ये व अन्य भुसारी साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील सुपर मार्केट्स व गोवा बागायतदार येथे लोकांनी धाव घेतल्याचे दिसून आले.

Related Stories

सरकारने सांगे येथे बैठक घेऊन तोडगा काढावा

Patil_p

माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे निधन

Amit Kulkarni

काणकोणात 45 वर्षांवरील पूर्ण लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज

Omkar B

काणकोणात 5 कन्टेनमेंट झोन जाहीर

Amit Kulkarni

नोकरभरतीवरील बंदी 30 नोव्हेंबरला उठणार

Patil_p

शांत रस्ते, सामसूम बाजार..दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट..!

Omkar B
error: Content is protected !!