तरुण भारत

सत्तरीत काळी मीरी उत्पादनाला येणार चांगले दिवस

वाळपई / प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयात काळीमिरी उत्पादनाला चांगल्या प्रकारचा वाव आहे.  पोषक जमीन व त्यामध्ये आंतरपीक म्हणून या उत्पादनाला चांगल्या प्रकारचा वाव मिळत असल्याने आज मोठय़ा प्रमाणात काळी मिरीचे उत्पादन होऊ लागले आहे. मात्र येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात काळीमिरी उत्पादन भरमसाठ पध्दतीने करण्याचा वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे या प्रयत्नांना सुरुवात झाली असून या संदर्भात एक कार्यशाळा नुकतीच कृषी खात्याच्या धावे येथील फार्ममध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयातील युवा कृषी शेतकरी उपस्थित होते

Advertisements

सध्याच्या वाढणाऱया माकडांचा उपद्रव व रानटी जनावरांचा पादुर्भाव यांच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी सत्तरी तालुक्मयात काळीमिरी हे एकमेव उत्पादन शेतकऱयांसाठी पर्याय म्हणून समोर येत आहे .रानटी जनावरांचा या उत्पादनाला प्रादुर्भाव नसल्यामुळे शेती बागायतीत व कुळागारात आंतरपीक म्हणून त्याला चांगल्या प्रकारचा आहे. सत्तरी तालुक्मयात गेल्या काही वर्षापासून या संदर्भात लागवड सुरू झालेली आहे.मात्र नवीन पद्धतीच्या लागवडीच्या माध्यमातून याला चांगल्या प्रकारे वाव देण्यासाठी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाकडून प्रयत्नांना सुरुवात केलेली आहे.यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत काणकोण येथील प्रगतशील काळीमिरी उत्पादक अजित पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.यावेळी त्यांनी उपस्थितांना काळीमिरी लागवडीचे शास्त्र व्यवस्थापन व नवीन पद्धतीच्या लागवडी संदर्भाचे सविस्तरपणे माहिती दिली .शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने काळीमिरी लागवड करीत आहेत मात्र यामध्ये नवीन तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास या उत्पादनांमध्ये दुप्पटीने वाढ होऊ शकते यासाठी कशा प्रकारे व्यवस्थापन करता येईल यासंदर्भात सविस्तरपणे त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर काळी मिरी  बुश उत्पादन कशाप्रकारे करता येते व त्या संदर्भाची कलमे कशाप्रकारे आपण विकसित करू शकतो या संदर्भाची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

 याप्रसंगी उपविभागीय कृषी कार्यालयाचे शेतकी अधिकारी विश्वनाथ गावस उपस्थित होते .त्यांनी या संदर्भात बोलताना सत्तरी तालुक्मयांमध्ये काळी उत्पादन प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात वाव आहे. यासाठी तरुण शेतकरी बांधवांनी पुढे येणे गरजेचे असून यातून दरवषी मोठय़ा प्रमाणात आर्थिक स्तोत्र निर्माण होऊ शकतो .आज प्रत्येकजण सरकारी नोकरीच्या मागे पळत असतो. मात्र शेतीच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे अर्थप्राप्ती होऊ शकते. यासाठी सध्यातरी एकमेव पर्याय म्हणजे काळीमिरीचे उत्पादन. शेतकी खात्याच्या संपूर्ण सहकार्याच्या पाठबळावर यंदा सत्तरी तालुक्मयात प्रचंड प्रमाणात काळीमिरी उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत .यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शेती खात्याचे सहाय्यक कृषी अधिकारी समीर गावस रणजीत मापसेकर दत्तप्रसाद जोग मयुरेश भट व इतरांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले.

मसाल्यांचा राजा.

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्?कृष्?ट दर्जा असल्?यामुळे जाग?तिक काळी मिरीच्?या 90 टक्?के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्?के परकीय चलन एकटया काळा मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते.

भारतात उत्?पादन होणा-या एकूण काळी मिरीपैकी 98 टक्?के उत्?पादन एकटया केरळ राज्?यात होते. त्?याखालोखाल कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो. महाराष्?ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड आढळते. कोकण किनारपटटीतील हवामान या पिकाच्?या लागवडीस अनुकूल असल्?याने आणि काळी मिरीच्?या वेलास आधाराची आवश्?यकता असल्?यामुळे सध्?या अस्तित्?वात असलेल्?या नारळ सुपारी झाडांवर वेल चढवून मिरी लागवड करता येते.

परसागेतील आंबा फणस यासारख्?या कोणत्?याही झाडावर वेल चढवून मिरी लागवड करता येते. त्?यामुळे घरातील सांडपाण्?याचा योग्?य उपयोगही केला जातो. आणि घरातील काळी मिरीची गरज भागवून आपल्?या काही प्रमाणात बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्?यातुन आर्थिक फायदासुध्?दा होईल. नारळ सुपारीच्?या बागा नसतील परंतु पाण्?याची सोय असेल अशा ठिकाणी पानमळयाच्?या धर्तीवर पांगारा लागवड करुन त्?यावरही स्?वतंत्रपणे मिरी वेल लावून उत्?पन्?न घेता येईल.

हवामान व जमीन

उष्?ण दमट व सम हवामानात या पिकाला अनुकूल आहे.  कडक उन्?हाळा किंवा अति थंड हवेत हे पिक येत नाही. हवेमध्?ये आद्रतेचे प्रमाण जास्?त असल्?यास हया वेलीची वाढ चांगली होवून भरपूर पीक मिळते.

मध्?यम ते भारी जमीन तसेच पाण्?याच्?या निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. थोडक्?यात ज्?या हवामानात नारळ, सुपारी यासारख्?या फळझाडांची लागवड होते किंवा होवू शकते. येथे मिरीची लागवड अगदी सहजरीत्?या करता येते. मसाल्?याच्?या इतर पिकांप्रमाणे या पिकास सावलीची आवश्?यकता असते.

सुधारीत जाती

केरळ राज्?यातील पेयुर मिरी संशोधन केंद्राचे पेयुर -1 ते पेयूर-4 हया नवीन जाती विकसि?त व प्रसारीत केल्?या आहेत. तसेच राष्?ट्रीय मसाला पीक संशोधन केंद्र कालीकत येथून शुभंकारा, श्रीकारा, पंचमी आणिर पौर्णिमा या जाती विकसित व प्रसारीत करण्?यात आल्?या आहेत.

कोकण कृषि विद्यापीठाने पन्?नीयूर संशोधन केंद्रातून पन्?नीयूर -1 ही जात संकरीकरण करून तयार केलेली जात आणून कोकणच्?या भौगोलिक परिस्थितीत त्?या जातीचा निकष आजमावून सदर जात कोकणासाठी प्रसारीत केली आहे. सदर जाती पूर्ण वाढीच्?या एका वेलापासून सरासरी सात किलो हिरव्?या मिरीचे उत्?पन्?न मिळते. पन्?नीयूर-1 जात गावठी मिरीपेक्षा जवळजवळ 3 पट पीक देते. पन्?नीयूर-2 ते पन्?नीयूर -5 तसेच श्रीकारा, शुभकारा, पंचमी आणि पौर्णिमा या जाती अभ्?यासही कोकण कृषी विद्यापीठाच्?या विविध संशोधन केंद्रावर चालू आहे

Related Stories

फोंडा नगराध्यक्षपदासाठी भाजपा विरुद्ध भाजपा

Amit Kulkarni

राऊल पेरेरा केपे पालिका रिंगणात उतरण्याची शक्यता मावळली

Amit Kulkarni

कृषी विधेयकास विरोध करणाऱया काँग्रेसचा निषेध

Patil_p

गोव्याच्या हिताआड येणाऱया प्रकल्पांना काँग्रेस पक्षाचा विरोध असेल

Patil_p

दिव्यांगासाठी आता तालुकापातळीवर शिबिरे

Patil_p

सिक्कीमचा 20 वर्षीय कोमल थाटल जमशेदपूर एफसी संघात

Patil_p
error: Content is protected !!