तरुण भारत

एपीएमसीमध्ये पहाटे 5 ते दुपारी 1 पर्यंतच व्यवहार

भाजीमार्केटमध्ये नियम पाळण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

एपीएमसी भाजीमार्केटमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे आता पहाटे 5 ते दुपारी 1 पर्यंतच भाजी विक्री व खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सॅनिटायझर व मास्कचा वापर याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. एपीएमसीमध्ये भाजी खरेदी-विक्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. जे दुकानदार आणि भाजी खरेदी व विक्रीदार नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Related Stories

कर्नाटक: खासगी रुग्णालयांच्या वृत्तीबद्दल मुख्यमंत्र्यांचा संताप, कडक कारवाईचे दिले निर्देश

Abhijeet Shinde

बेनाडीतील कुस्तीचा सुनील फडतरे मानकरी

Amit Kulkarni

मच्छेत घराची भिंत कोसळून दीड लाखांचे नुकसान

Patil_p

आम्हाला संरक्षण द्या… बिम्स् कर्मचाऱयांची निदर्शने

Patil_p

बियाणाच्या बाजरीने गाठली शंभरी

Patil_p

क. नंदगड येथे भाताच्या गंजीला आग

Patil_p
error: Content is protected !!