तरुण भारत

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच; आज ५७ रुग्णांची भर तर दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात आज दि. 21 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 27 पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले. यामध्ये कोल्हापूर महापालिका हद्दीतील सात, करवीर तालुक्यातील सात, हातकणंगले तालुक्यातील एक, पन्हाळा तालुक्यातील 10 आणि शिरोळ तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरमधील एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Advertisements

चोवीस पॉझिटिव्ह रुग्ण जयसिंगपूर, कुरुंदवाड, कसबा बावडा, फुलेवाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, पाचगाव, केरली, शिये, खुपीरे, शिंगणापूर 3, खाटांगळे, पंतनगर इचरकरंजी, पोरले येथील आहेत.

दुपारी दीडपर्यंत आणखी 30 जण पॉझिटिव्ह
जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 57 झाली. यामध्ये पोरले दोन, दरेवाडी 2 , हुपरी 16, कुडित्रे एक, रांगोळी, रेंदाळ, लोटेवाडी एक, शिंदेवाडी एक, सिद्धार्थनगर एक, मंगळवार पेठ एक, सुभाषनगरमधील चार जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू
करवीर तालुक्यातील सांगवडे येथील 91 वर्षीय पुरुष आणि शिये येथील 62 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. रविवारी शिये येथील मृत्यू झालेल्या व्यक्तीचाचा रिपोर्ट आज पॉझिटिव आला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 62 झाली आहे.

Related Stories

राज्यातील 32 कारखान्यांना 516 कोटींची थकहमी

Patil_p

धामणी खोऱ्यात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

triratna

कामगार दिनी टोल कर्मचारी पगारासाठी संपावर

Patil_p

पन्हाळा तालुक्यातील पोखलेत तरुणाची आत्महत्या

triratna

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा निर्णय

triratna

तालिबान्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; रोहुल्लाह सालेह यांची फरफट करत घातल्या गोळ्या

triratna
error: Content is protected !!