तरुण भारत

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात पाच जण पॉझिटिव्ह ; एकूण संख्या १३० वर

प्रतिनिधी / शिरोळ

गेल्या पंधरा दिवसात शिरोळ तालुक्यात कोरोनामुळे आठ जणांचा बळी गेला असून आज अखेर 130 जणांना बाधा झाली आहे. मंगळवार 21 रोजी 5 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. या संपर्कात आलेल्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी एस दातार यांनी दिली

दत्तवाड ता. शिरोळ येथील एका खाजगी डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात खिद्रापूर एक व सुरत येथील चार असे पाच लोकांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. शिरोळ तालुक्यात कोरोनाने थैमान मांडले असून दतवाड, घोसरवाड, खिद्रापूर, दानवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी 26 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. शिरोळ तालुक्यात आज दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

Related Stories

हॉटस्पॉट, कंटेन्मेंटमध्ये होणार रॅपीड ऍंटीजेन टेस्ट

Shankar_P

करवीर तालुक्यात खाजगी सावकारकी व गावठी दारू राजरोसपणे सुरु

triratna

उक्कडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Patil_p

ऑनलाईन बँकिगद्वारे साडेतीन लाखाची फसवणूक

Patil_p

ठाण्यातील भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

pradnya p

माणगाववाडीत हातभट्टीचे निर्मिती केंद्र उद्धवस्त

Shankar_P
error: Content is protected !!